सवय आहे सोबत चालण्याची ...
सवय आहे आपल्याना जोडण्याची...
सवय आहे योग्य वेळ आली तेव्हा झुकण्याची...
पण प्रत्येक वेळी झुकण्यास सांगत असाल तर शक्य नाही....
कारण सवय आहे स्वाभिमान बाळगण्याची...
-
ENGINEER ⚙️
Thoughts from the heart...
तुला बघुन पडतील शब्द नगरीचे पाऊले
तुला बघुन लुक लुकतील शारदाचे चांदणे
होय तुला बघून...-
आपण आयुष्य जगत असताना
आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती कडे दुर्लक्ष करतो
आणि स्वार्थी लोकांसोबत आपला वेळ खर्च करत असतो...
जेव्हा स्वार्थी लोक आपला रंग दाखवायला सुरुवात करतात
तेव्हा वेळ निघून गेलेली असते...
-
प्रेमवेडा होतो मी
म्हणून शब्दवेडा झालो मी
जितका तुझ्यात रमलो मी
तितकाच कवितेत व्यक्त झालो मी
तुझ्यापासून दुरावताना
कवितेतून मात्र रडलो मी
-
प्रेमाची पेरणी केली म्हणून
प्रेमच उगवेल अस नसत
कधी कधी दुःख पण नशिबी येत
कारण पेरणीसाठी निवडलेली जागा
त्यासाठी अयोग्य ठरते-
निसर्गाचा समतोल साधण्या पेक्षा
समतोल बिघडवण्यास मानवाने पसंत केले...
अहंकारी मानवाला म्हणून का
आज निसर्गाने आपल्यातून वेगळे केले...
निस्वार्थ प्रेम देणारे झाड मानवाने उध्वस्त केले
अहंकारी मानवाला म्हणून का आज
झाडांनी प्राणवायू देनच बंद केले...
काही क्रूर लोकानी निसर्गाला त्रास देणं पसंत केले
यामुळे मात्र काही निष्पाप लोक याचे बळी ठरले... sparsh_manuskicha-
निशब्द झालंय जग
निशब्द झालंय आयुष्य
फक्त एक विचार जगण्याची प्रेरणा देतोय
सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो
मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो
वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् ॥
🙏श्रीमद्भागवत गीता🙏
विनायक महाजन-
कोरोणा काळात आपल्याना मदत करता येत नसेल
तरी चालेल...
पण ते एकटे असल्याची जाणीव मात्र त्यांना होऊ देऊ नका...
आपण त्यांच्या सोबत आहोत ह्या विचाराने त्यांचा आत्मविश्वास वाढण्यात मदत होईल...
हे पण दिवस निघून जातील हे लक्षात असूद्या
फक्त काळजी घ्या आणि संयम ठेवा...
-
कधी शस्त्र म्हणून उभी राहते
कधी आठवण म्हणून सोबत राहते
सुख दुःख व्यक्त करण्या
तिची साथ मात्र कायम राहते
अश्या शब्दरूपाने व्यक्त होणाऱ्या भावनांना
कविता म्हणून ओळखले जाते
-
शब्द नगरीचा प्रवास जरा आपलासा वाटतो
कारण या नगरीमध्ये
एकटेपणाचा ही विसर पडतो
आठवणींना उजाळा देण्या
हा प्रवास महत्वपूर्ण ठरतो
कधी अश्रूं अनावर होतात
कधी स्मितहास्य मुखी फुलवतो
शब्द नगरीचा प्रवास जरा आपलासा वाटतो...-