सोबतीच्या वाटचालीस जिवलगा संगतीला हवी…
-
मुक्या हृद्याचे हे बोलणे
मुकी ती शाई
कागदावर ते टिपणे
तल्लीन तुझ्यात मी कव... read more
कयामत केव्हाच बेशुमार मज लुटून गेली
हयात जगण्याची बहाल-ए-दिल बरसून गेली
तुजवर काफिया जहाल-ए-बेगम मी अदा करू
तसव्वूर फैज माझा हृदय सखा जाळून गेली
ईबादत तुजवर तुझ्याशी सवांद रोजच व्हावा
शमे-ए-रात सानिया नजरेत चंद्र बंद करून गेली
ताल बैरागी तमन्ना तहान तृष्णेचा गुलाम गुलमोहर
सोहबत-ए-सितम हृदयास मझिया ती चिरून गेली…-
पेटवून घ्यावे म्हणतो स्वतःस आता
स्वप्नांना तेव्हा माझ्या तुम्ही अजरामर करावे…-
विरहात विरहाची ही नोंद नाही
जिवलगा पुन्हा मज भेटली नाही
न वाटून घेतले दुःख त्या क्षणी तेव्हा
बोलवण्यास प्रेम माझे तेव्हा चुकले नाही…-
वेळेनेच वेळेची ही जखम दिली
अवेळीच यातणांची ही झोळी दिली
बदलेन वेळ जरी बदलले हे लोक नाही
वेळेनेच तेव्हा मज ही हमी दिली…-
मौलिक आहे मोतीयांचा हार सखा
मौलाचे मरण कुणास काही पसंद नाही
पदोपदी तुझ्या सवे चालण्याचा करार होता
सात जन्माची रेशमगाठ अजूनही तुटली नाही…-
हे हसणे ही तुला हसणे न वाटे
प्रेम माझिया तुला प्रेम ही न वाटे
नेमका पुरावा तुला आता कोणता हवा
पुरावा ही सखा तुला खरा न वाटे
हे नुकतेच नवखे मजला छळणे तुझे
तुझेच तुला का सखा तेव्हा नवल वाटे
येण्यास जवळ तुझी का आता तक्रार आहे
तैशीच तक्रार तुझी देण्यास मज बहाणा वाटे…-