कोरोना संकटाच्या काळात एक गोष्ट लक्षात आली की, भारताला खरी लढाई वैचारिक दारिद्र्या विरुद्ध लढावी लागणार आहे.
#जागतिक_साक्षरता_दिन-
Humanity and Rationality over Ide... read more
चांगल्या गोष्टीला चांगले म्हणण्याइतपत चांगलेपणा माणसामध्ये असावा, प्रत्येक गोष्टीत 'राजकारण' शोधल्यास तो नीचपणा होतो.
-
तुमच्या शिक्षणाचा उपयोग जर समाजाच्या भल्यासाठी होत नसेल तर तुम्ही जिवंतपणीच मेलेले आहात.
-
ज्या देशात लोकांच्या मरणाचाही इव्हेंट होत असेल त्याचे भविष्य अंधारमय आहे.
जगण्याला शिस्त हवी..!
#CivicSense #CoronaVirusPandemic-
अडाणी माणूस एखादी गोष्ट चुकीची बोलतो ते आपण समजू शकतो पण स्वतःला सुशिक्षित समजणारे जेव्हा तर्कहीन बोलतात किंवा वागतात तेव्हा त्यांची खूप कीव येते.
#सुशिक्षित_अडाणी-
'मराठी' तुमच्यासाठी काय आहे..? मराठी माझ्यासाठी सर्वकाही आहे..तिच्याशिवाय जगणे अवघड आहे कारण ती आपल्या माणसांना एकत्र आणते. तुम्ही भले कितीही हुश्शार असा, कितीही अस्खलित इंग्रजी बोला पण आपल्या माणसांच्या भावना फक्त आपल्या भाषेतूनच कळतात.
तुम्ही विदर्भाचे, मराठवाड्याचे, कोकणातले,पश्चिम महाराष्ट्राचे, उत्तर महाराष्ट्राचे कुठलेही असा तुमची स्वतःची बोलीभाषा आहे, ती जपा, वाढवा कारण तिच्यात आपलेपणा आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे.
मी लहानपणापासून शहरात शिकलो त्यामुळे गावातली माणसं माझ्याशी मराठीत बोलतात पण मी मुद्दामहून 'अहिराणी'(मराठीची उपभाषा) बोलतो कारण ती मला सहज त्यांच्याशी जोडते. ज्यांच्या अंगाखांद्यावर आपण खेळलो, ज्यांच्यासमोर आपण उघडे-नागडे फिरलो त्यांच्यासमोर आपल्या बुद्धिमत्तेचे प्रदर्शन कशाला..? आपल्या माणसांसाठी फक्त आपली भाषा..!
~विलास निकुंभ
#आमची_माती_आमची_माणसं
#माय_मराठी-
लोकांसाठी तुम्ही चांगले किंवा वाईट हे तुम्ही त्यांच्या सोयीनुसार वागता की नाही यावरून ठरतं.
~ vilas nikumbh
-