Vilas Kudake  
174 Followers · 204 Following

Joined 24 July 2017


Joined 24 July 2017
13 MAR 2023 AT 13:56

आई तू सावली आभाळभरुन मायेची
स्निग्ध तुझ्या डोळ्यात दृष्टी करुणेची..

आई तुझ्या सहवासात ऊब जगण्याची..
थकली गात्रे परी न थकली तू
मूर्ती ऊर्जेची..

तुझ्या छायेत श्रीमंत बालवये सगळ्यांची..
उंच भरारीचे बळ मिळाले
तू श्रीमंती सगळ्यांची...

-


13 MAR 2022 AT 17:20

आई तुझी स्निग्ध छाया
लाभली अपार माया..

आई तुझे हात कष्टाळू
गगनावरी नेला वेलू..

आई तुझे अथक पाय
कधीही न झाले निरुपाय..

आई तुझ्या नजरेत गोकुळ
सुखदुःखात होई व्याकुळ..

आई तुझी गातच रहावी थोरवी
जोवर नभात राहे शशि रवी!

आई तुझ्या चरणी श्रद्धा सुमने
सहस्रचंद्र दर्शनी भिजली मने

-


14 FEB 2022 AT 16:25

जी स्वप्नातही भेटली तरी मन हरखून जाते..

जिच्या खळाळून हसण्याने मन वेडावून जाते..

जिच्या डोळ्यातील पाणी हृदयाचा ठाव घेऊन जाते..








त्या लाडक्या प्रियेस आजच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💘😘😘😘— % &

-


15 NOV 2021 AT 12:40

गारठलेले
पाखरु अलवार
ओठी सुस्वर

-


15 NOV 2021 AT 12:36

नांगरलेली
भुई काळी खुशीत
पिक स्वप्नात
डोईवर ढगाळ
सावली ती मायाळ

-


11 NOV 2021 AT 16:13

हायकू

लुकलुकत्या
तारका अंधारात
आशा पल्लवित

-


11 NOV 2021 AT 16:10

हायकू

फजिती झाली
पाऊस अवकाळी
रयाच गेली

-


11 NOV 2021 AT 16:03

तांका

तांका गुंफला
टाका जणू जीवनाला
अर्थ कळला
क्षण हृदयी जपला
आनंदे लहरला

-


11 NOV 2021 AT 16:02

तांका

गुल्फीच्या काड्या
जिलेटिन पेपर
आकाशदीप
निंबाच्या झाडावर
आनंद अनावर

-


11 NOV 2021 AT 16:00

तांका

नाकारलेले
तरीही प्रेम खरे
गर्द गहिरे
एकटेच झुरते
चांदण्यात उरते

-


Fetching Vilas Kudake Quotes