राजा सणांचा श्रावण
राजा सणांचा श्रावण.. येता सारे आनंदले,
मनी उत्साह उमेद.. भावविश्व मोहरले.
वसुंधरा बहरली.. दरीखोरी निनादले,
वेग झऱ्याला मिळता.. रानमाळ उजळले.
आराधना सुरू झाली.. शंकराला उपासले,
कृपा मंगळागौरीची.. खेळासंगे मिळवले.
नागपंचमीला पूजा.. जिवंतिका व्रत केले,
राखी बांधून भावाला.. बंधनाने रक्षलेले.
पौर्णिमेला नारळाला.. समुद्राला अर्पलेले,
सण पोळ्याला बैलाचे.. धन्यवाद मानलेले.
कृष्णजन्म अष्टमीला.. मध्यरात्री जमा झाले,
दहीहंडी फोडण्याला.. थर मनोरे लागले.
ऊर्जा देऊन सर्वांना.. एकत्रित आणलेले,
सृष्टीसंगे संस्कृतीला.. श्रावणाने जपलेले.
स्वप्नगुंफण @ विक्रांत लाळे-
हिरवा श्रावण नटला
हिरवा श्रावण नटला.. खेळ पावसाचा रंगला,
निसर्ग सोहळा पाहून.. पुन्हा जीव हा आनंदला.
डोंगर माथ्यावर तृण.. नवेला अंकुर फुटला,
गुंफण घालता वेलींचा.. जीव झाडांवर गुंतला.
पाऊस गारा ऊन वारा.. खेळू रानामध्ये लागला,
काळे ढग दिसता मोर.. वनी आनंदाने नाचला.
नवसंजीवनी जागली.. रानमेवा सुद्धा फुलला,
इंद्रधनुष्य नभामध्ये.. अधिक गडद खुलला.
पक्ष्यांच्या किलबिलाटात.. पुष्प मकरंद हर्षला,
नाद झऱ्या धबधब्यांचा.. दर्याखोऱ्यातून गुंजला.
रानमाळ हिरवेगार.. जसे की शालूच नेसला,
पिवळसर कवडसा.. उन्हाचा सडा पहुडला.
वैभवी लेणे हे घेऊन.. हिरवा श्रावण नटला,
निसर्ग सोहळा पाहून.. पुन्हा जीव हा आनंदला.
स्वप्नगुंफण @ विक्रांत लाळे-
स्पष्ट असावा, खरा असावा..
पाण्यासारखा नितळ असावा.
अडकलेल्या प्रश्नासाठी..
तो नेहमीच एक उत्तर असावा.
यश मिळता चारचौघात माझे..
तो कौतुक करणारा असावा.
अपयश पचवताना खांदासुद्धा..
तो न मागता देणारा असावा.
कुठलीही चूक झाली तर कान..
कोपऱ्यात पिळणारा असावा.
सुखदुःखाच्या चादरीचा तो..
एका बाजूचा किनारा असावा
मी जिथे नसेल तिथे माझ्या मागे..
तो माझा प्रतिबिंब असावा.
आणि मी असताना देखील तो..
माझ्यातलाही मीच असावा.
गरज लागेल त्या क्षणाला तो..
माझ्यासमोर उभा असावा,
अडकलेल्या प्रश्नासाठी..
तो नेहमीच एक उत्तर असावा.-
बहरली वसुंधरा.. दरीखोरी निनादले,
वेग झऱ्यास मिळता.. रानमाळ उजळले.
स्वप्नगुंफण
@ विक्रांत लाळे-
राजा सणांचा श्रावण.. येता सारे आनंदले,
मनी उत्साह उमेद.. भावविश्व मोहरले.
स्वप्नगुंफण
@ विक्रांत लाळे
!! श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा !!-
जरी कुणालाही ती हसून भेटायची..
मला थोडीशी चिंता त्या क्षणाला वाटायची,
माझ्यापासून तिचे दूर होणे नकोसे..
नि तिला गमविण्याची मनी भीती दाटायची.
स्वप्नगुंफण
@ विक्रांत लाळे-
स्वप्नगुंफण
@ विक्रांत लाळे
निरुत्तर झाला माझाच प्रश्न..
नि त्या प्रश्नासोबत मी,
उभी समोर ती नजरा रोखून..
नि पाहत शून्यामध्ये मी.-
माझ्या या बोटांना..
टोचले तेव्हा काटे,
गुलाबा सोबत मी..
जोडले जेव्हा नाते.
स्वप्नगुंफण
@ विक्रांत लाळे-
दाटून आलेले मळभ आता..
किती काहीही केले तरी सुटणार नाही,
हे आकाश पुन्हा निळे मला..
आणि ते क्षितिज रंगीत दिसणार नाही.
स्वप्नगुंफण
@ विक्रांत लाळे-
स्वतःचे स्वतःशी भेटणे..
असे गेले काही दिवस झालेच नाही,
स्वतःलाच नाकारले मी..
पण का ते मात्र मला कळाले नाही.
स्वप्नगुंफण
@ विक्रांत लाळे-