आजही सलतो क्षण
क्षण तुझ्या पहिल्या भेटीचा
साचलेल्या पापण्यात थेंब
थेंब तुझ्या प्रेमळ आठवणीचा-
आजभी हर कदम पर
काँटे बनकर चुमती है सपनों को मेरे
आजभी हर एक राह पर
जब जब फुल बनकर आती है जिंदगी में मेरे-
अस्तित्व की तलाश
में भटक रही हूँ में यहाँ वहाँ
अब ये पता नहीं की
मंजिल लेकर जा रही है मुझे कहाँ-
ओळखीच्या खाणाखुणा
तुझ्या माझ्या
पहिल्याच भेटीच्या...
नकळतच गुंतून
गेलेल्या खुणा प्रेमाच्या....॥
ओळखीच्या खाणाखुणा
तुझ्या माझ्या
पहिल्याच स्पर्शाच्या....
लाटा वाहणाऱ्या
अंतर्मनात स्पंदनाच्या...॥
ओळखीच्या खाणाखुणा
तुझ्या माझ्या
पहिल्याच आठवणीच्या...
हृदयात दरवळणार्या
गाठीभेटी सुगंधाच्या....॥-
एक खडतर प्रवास आयुष्याचा
क्षणोक्षणी मिळतो चटका अनुभवाचा
चढउतारांचा पाढा सुख दुःखाचा
एक क्षण आयुष्यभर शोधतो समाधानाचा
मनावर भडीमार न मिळालेल्या प्रश्नांचा
असाच काहीसा प्रवास शेवटच्या घटकेचा-
चेहर्यावर ओढला पदर तुझ्या प्रेमाचा
हळूच नजर चोरून बघते कोपरा तुझ्या मनाचा
ओठांवर दाबून ठेवला शब्द तुझ्या भेटीचा
अलगदच स्पर्श करुन अंतर्भाव तुझ्या आठवणीचा-
विस्कटलेल्या केसात लपून
गेलेले मनमोहक सौंदर्य हे तुझे
निरखून बघू दे जरा मलाही भिजून
गेलेले मनस्वी रुप हे तुझे-
एक वाट सापडलेली चालता चालता
अर्ध्यावर सोडून गेलेल्या प्रेमाची मला
पुन्हा ताजी करुन गेली आठवण वाट ती
जिथे विसरुन गेलो होतो मी स्वतःला-
सहवासात चालताना बरोबर मी तुझ्या
सुखावतात प्रत्येक क्षण प्रेमाचे माझे
मिठीत येताना जवळ मी तुझ्या
दरवळतात प्रत्येक श्वास हृदयाचे माझे-