आज समजवतीय तुला,
ऐक रे वेड्या मना...
का डोकावतोयस् त्या आयुष्यात
जिथे गिनती तुझी शुण्यात...०
:- वैष्णवी अंधारे-
Tera kiya
Agar Tujh Par Hi aa Jaye
To Kaisa Hoga ,
Jo Dard Tune Mujhe Diye,
Wo koi Tujhe De Jaye
To Kaisa Hoga...
Har Baar Mukarta Hai Na
Tu Apni Baat Se,
Is Baar Mai Mukar Jaun
To Kaisa Hoga ...-
लोकांना बदलता येत नसेल...
तर,
लोकंच बदलून टाका...
कारण आठवण मनात दाटते...-
मी चंद्र की
चंद्रावरचा डाग,
मी मुलगी की
मुलगी म्हणून जन्मल्याचा राग...
-
दिवाळी झाल्यावर लगेच पाठवते,
ते माझे आजोळ...
शाळेला सुट्टी मिळाली तर पहिली आठवण,
म्हणजे माझे आजोळ...
लहानपणी सर्वांचे एकत्रितले ठिकाण,
म्हणजे माझे आजोळ...
आता मात्र आठवणीतल्या आठवणींमध्ये
आठवण म्हणून राहिले,
ते म्हणजे माझे आजोळ...-
आता ग्रहण शेतीला लागलय।
काही दिवसांनी लोकांना लागेल।।
पुन्हा एकदा गुलामीच्या आगीचा शेक लागतोय।।
शेतकरी नावाला #जगाचा_पोशिंदा असल्याची भूमिका निभवतोय।।
जगणे कठिन झालय म्हणून संपवन्यासाठी झाडाचा आसरा घेतोय।।-
येऊन तुझ्या मिठीत
मोकळं व्हायचंय मला,
खूप समजवले मी मनाला
आता तूच समजव माझ्या मनाला...
-
सर्वकाही जवळ असताना
मन माझ राहवेना,
सारखं सैरावैरा शोधतय
नेमकी डोळ्यातील आसवे
ओठांवर येऊन बोलताहेत
...काहीतरी हरवलंय...-
गुंतायचयं मनाला तुझ्यात...
मन माझं भाषा तुझी बोलतयं...
गुंतायला तुझ्यात रंगतयं...
एक धागा जमा करायला सारखं सुटतयं...
सैरा-वैरा आठवणी कवटाळतयं...
मनाचं तुझ्या घरटे मला विणायचयं...
आठवणींने आयुष्य सोबत तुझ्या घालवायचयं...
:-वैष्णवी अंधारे-
एक नवं पाऊल,
सोबत तुझ्या टाकणार ,
स्वप्न दोघांनी मिळून बघू असं सतत सांगणार...
एक नवं पाऊल,
नवी ओळख माझी दाखवणार,
तुझीच बनून आयुष्य मी जगणार...
एक नवं पाऊल,
साथ तुझी मिळविणार,
रोज नव्यानी प्रेमात तुझ्या पडणार...
एक नवं पाऊल,
चार पावलांनी सावरणार,
संसार नावाचा आभास कळविणार...
-