Vaidehi Kanade - Shhalu   (@वैदेही शाळू)
47 Followers · 37 Following

Joined 10 July 2020


Joined 10 July 2020
31 DEC 2024 AT 21:41

दिवसामागून दिवस जाती
महिन्यांपाठी वर्ष ही सरते
काय मिळवले काय गमवले
काय अनुभव गाठी आले...
करुनी थोडे अवलोकन हे
नव वर्षाला जाऊ सामोरे.

-


5 NOV 2024 AT 23:55

पुनवेचा चंद्र आणि "चौदवी का चाँद"
यांचंच कौतुक यांनाच मान..
चतुर्थीची चंद्रकोर
आवर्जून पहावी...
आकाशात स्मितहास्याची
लकेर उमटावी ...
नाजुक रेखीव चंद्रकोर अशी
वाढवी नजाकत रजनीची
आकाशाच्या भाळावर
मराठमोळी बिंदी जशी.

-


17 SEP 2024 AT 21:44

तू जाताना भरून येती
डोळे आमचे बाप्पा रे
सृजनाचे होतेच विसर्जन
शिकवून जाशी तू आम्हा रे..
मूर्तरुप झाले विसर्जन जरी
तत्वरूपे तू आहेसच रे
मनामनातून भक्ती भावातून
पुरून तू उरतोसच रे...
गणपती बाप्पा मोरया!🙏

-


21 MAR 2022 AT 23:29

मुकम्मल नही हो पाती वो
मशहूर मोहब्बत हो जाती है
जो कर ले हासिल मुकाम को
दुनिया के दस्तूर में फँस जाती है

-


17 MAR 2022 AT 0:18

मनाच्या बेड्या
मी भावनांवर घातल्या
येणारे उमाळ्यांना
बांधून मी ठेवले
अस्फुटसे हुंदके
डोळ्यांतले पाणी
ऒठांत दाबून
पापण्यांत सावरून
सावरले स्वतःला
दुनियेशी लढायला!!
खंबीर मी दिसते
करारी मी वाटते
पण दिसत नाहीत कोणालाही...
माझ्या मनावरच्या बेड्या....

-


7 NOV 2021 AT 22:36


संतुलन बनाये रखना
रिश्ते सँभाले रखना
न जाये कोई बात चरम पर
ये ध्यान हमेशा रखना

पल भरकी चूक हुई और
परिसीमा गर हो जाती
जो नीव न हुई संतुलित
रिश्ते गिरते देर न लगती

-


31 OCT 2021 AT 10:48

आईने में खुदकी आँखोंमे देखो
खुदही के दिलमें उतरकर तो देखो
हँसते चेहरेसे देखो मायूस दिल को
दिल भी हँस पडेगा हँसाकर तो देखो.

-


12 OCT 2021 AT 22:47

थाम लिया जो हाथ तुम्हारा
एक कर दिया लकीरोंको
जो तेरी वो किस्मत मेरी
चल दिये है साथ निभानेको

-


18 SEP 2021 AT 0:10

मोदी जी से सीखा
राष्ट्रप्रेम का पाठ
कुछ भी चाहे बोले कोई
करते रहना राष्ट्रहित में काम

-


10 SEP 2021 AT 23:41

अनादी तू अनंत तू
निर्गुण अन् निराकार तू
भक्तांसाठी झालास साकार
लंबोदर वक्रतुंड तू
ब्रह्मांड व्याप्त सृष्टीस आधार
गणाधीश अन् गुणेश तू
तुझीच सत्ता चराचरावर
विघ्नहर्ता वरदायक तू
काय अर्पावे तुझ्या चरणांवर
त्र्यैलोक्याचा आधीपती तू
🙏🙏🙏🙏

-


Fetching Vaidehi Kanade - Shhalu Quotes