वा-याचे मुक्तपणे उधळणे
पानांचे त्यावर भाळणे
किती सुखद सहवास....
प्रत्येकाला हेवा वाटावा
असे जीवन जगणे...
प्रेमात आस असावी
मुक्तपणाची सैर असावी
एकमेकांना समजून घेण्याची
मनाची तयारी असावी...
हेच तर शिकवतो निसर्ग
वा-यासम मुक्त जीवन जगणं
अन् पानांसारखं खत होऊन
दुसऱ्यांसाठी जगणं.....
@ उजू
-
Writing is one of my oppournity as fav... read more
फुलांचा राजा गुलाब
ताजेतवाने करतो मनाला ,
मनमोहक ,आकर्षक
रंगांनी खुलवतो जगाला
गंध दरवळतो सुगंधी
जणू कुपी अत्तराची,
पाकळ्यांचे कुस्करणे
महती सांगे त्यागाची....
फुलतो काट्यांच्या कुशीत
मुकुटही घालतो काट्यांचा,
संकटांवर मात करून हसत रहावे
संदेश देतो जगाला मोलाचा .....
धरतीवरील सर्वात सुंदर फूल
म्हणून मान मिळाला मान राजाचा,
ऊन,वारा,पावसातही फुलतो
विविध नाविन्यपूर्ण रंगांचा....
उजू
-
गळून पडलेलं पान
आहे ईश्वराचं दान,
खत होऊन जगणं
हाच जीवनात मान
गळून पडलेलं पान
शिकवतो स्वाभिमान
अपयश आलं तरी
ठेवावं स्वत: भान
गळून पडलेलं पान
शिकवते येथे झिजणे
आयुष्य संपल्यावरही
गात राहावे जीवनगाणे
@ उजू
-
मैं एक पेड़...
धरती की गोद में बीज बनकर बोया ।
सूरज की किरणोंसे ,पाणी की बौछारसे
अंकुर होकर खुद को जगाया ।
हवा के संग झुमा, बारिश के संग नहाया ।
अपने हरियालीसें सबका जीवन महकाया ।
मेरे अंगसे बने कुल्हाडीने,मुझ पर वार किया ।
जड़े थी मजबूत,जड़ो से ना हिला ।
मानव को हर तरह से सुख दिया ।
पेड़ हूँ मैं, मैं सिर्फ खडा नहीं रहता ।
दुसरों को जीवन देता हूँ ।
हर एक को खुशी देता हूँ ।
©® उजू
-
तू आहेस म्हणून मी आहे
तुझ्याविना जीवन अपूर्ण आहे
कशाला घेतोस माझी परीक्षा
तू आहेस म्हणून मी संपूर्ण आहे...
नको दाखवूस तुझा तोरा
आदराने वागण्यात खरे मर्म आहे
रेशमी बंधनात आपण जखडून आहोत
दोघांनी समजून घेणे,हेच कर्म आहे ...
तुझ्या असण्याने आहे माझी शान
जीवन म्हणजे जगण्याचे सुखद भान
एकमेकांच्या आधाराने जगणे सुंदर
सुखी जीवनाचा हाच मंत्र महान....
@ उजू
-
अगर आपको लगता है
जीवन अच्छा होना चाहिए |
तो धरती पर हरदम
पेड,पौधे लगाना चाहिए|-
माझ्या कवितेच्या ओळी
शब्द मनातले जोडी,
भावनांची जणू जाळी
जीवनाची शब्द कोडी...
मनी दाटलेले शब्द
झाल्या कवितेच्या ओळी,
देता साज व्याकरणाचा
कवितेची खुले कळी...
माझ्या कवितेच्या ओळी
देती मनाला गारवा,
जणू भाषेचा सुखद
खुला सुगंधी मारवा
@ उजू
-
न दिसणाऱ्या सरी, मनात कोसळतात
डोळ्यांच्या पापणींशी संवाद साधतात
न दिसणाऱ्या सरी, मनाला करतात बेधुंद
शब्दांनी कवितेला करतात ओलेचिंब
न दिसणाऱ्या सरी, आसवांना देती वाट
नात्यांच्या रेशीम गाठी करतात दाट
@उजू
-
कडू गोड आठवणींची
हृदयात दडलेली आहे पुंजी,
घेतलेले अनुभव सतत
मनात घालतात रुंजी....
कडू गोड आठवणींनी
जीवनाला मिळते उभारी,
संकटांचा सामना करण्याची
मनाची पक्की असते तयारी.....
कडू गोड आठवणी
आयुष्यात आणतात रंगत,
द्वेष अन् तिरस्काराची
सोडून द्यावी संगत
©® उजू
-
वर्तमान में भविष्य के बीज बोयें ।
अपनी मेहनत पर विश्वास करो ।
कभी न इस ज़िंदगी से हारो।
वर्तमान हैं एक अनमोल गहना ।
कभी न जिंदगी में इसको खोना ।
हर एक पल को हैं संभालना ।
जीते जी सबकुछ तो पाना ।
तुम कभी न मानो जीवन में हार।
कल जो किया,उसमें लाकर सुधार
भविष्य के लिए , वर्तमान में जीना
यही है जीवन का असली सार।
@उजू-