पुरवता पुरवता
किती काळ गेला असाच निघून
किती गेले पावसाळे आणि
किती काळ पडलेले ऊन
पण समाधान सापडे ना कुठे
गेला जीव थकून भागून
हट्ट गेले असेच वाढत
एकाच्या एक मागून
— % &-
उद्याचा
महत्त्वाचा आजचा क्षण.
राग, रुसवा सारे काही
चला विसरूया आपण.
क्षणभंगुर हे जीवन आपले
उत्साहात साजरे करूया.
एकमेकांना समजून घेत
सुखाचा मार्ग हाती धरूया.
-
गुरू पदी लीन व्हावे ।
सदा मुखीं नाम घ्यावे ।। १ ।।
गुरू जीवाचा आधार ।
देई जीवना आकार ।। २ ।।
योग्य मार्ग शिकवण ।
मना घालती कुंपण ।। ३।।
करुनिया गुरुभक्ती ।
वाढे बळ, आत्मशक्ती ।। ४ ।।
गुरू ममतेचा झरा।
गुरू मनाचा आसरा ।। ५ ।।
आधी गुरूंना नमावे
व्रत त्यांचे आचरावे ।। ६ ।।
-
अजून किती सहन करायची!
सततची मनाची चाललेली घुसमट
जिंकूनही मानायची हार आणि
सतत बोलणी ऐकायची लागट....
बस, आता उठवायचा आवाज
उतरवून टाकायचा समोरचा माज
एकच गोष्ट करायची साधी
मनाचं आपल्या ऐकायचं आधी...-
काही काही साधी सरळ माणसं
नेहमीच गृहीत धरली जातात
इच्छा आकांक्षा साऱ्या त्यांच्या
मनातल्या मनात तशाच राहातात
-
तुझी ओढ वेडी छळे ह्या मनाला
किती वाट पाहू जरा सांग ना.
तुझ्या सोबतीने मला यायचे रे
जरासा तरी तू इथे थांब ना.
तुझा हात हाती सदाचा असावा
तुझा स्पर्श होता फुलावी फुले
मनाच्या महाली तुला आठवावे
तुला पाहता प्रीत माझी खुले..
-
न बोलताही मनातले सारे
तुझ्यासाठी सताड उघडलेली
मनाची माझ्या खिडक्या दारे
तुझ्या सोबत स्वप्ने पाहिली
नकळत मनात जागल्या आशा
न सांगताही सारेच कळते
जाणतोस तू माझ्या प्रेमाची भाषा
-
जो पास था वह सब कुछ दे दिया ।
समय के साथ जाने क्यू आज उन्होने
एक पल में सब कुछ भुला दिया ।
प्यार था या फिर वह गलती थी मेरी ।
आज फिरसे वह सब याद आ गया ।-
जो पास था वह सब कुछ दे दिया ।
समय के साथ जाने क्यू आज उन्होने
एक पल में सब कुछ भुला दिया ।
प्यार था या फिर वह गलती थी मेरी ।
आज फिरसे वह सब याद आ गया ।-