त्या पारावरच्या झाडांवर
पाखरं आता बसत नाही,
राहील काय आता पहिल्या सारखं
म्हणून चुकूनही फडकत नाही...
भल्या पहाटेचा किलबिलाट
आता ऐकूसुद्धा येत नाही,
बसायची म्हाताऱ्यांची पंगत तिथं
आता जुने चेहरे काही दिसत नाही...
आंबट गोड चिंचानी खिसे
भरून जायची,पहिल्या सारखी चिंच हि
आता चव काही देत नाही,
त्या पारावरच्या झाडावर
पाखरं आता बसत नाही...
चेहरे हि बदलून गेलीत
आता माणूसकीही कुठे दिसत नाही,
कुठं राहिलं गाव माझं शोधूनही
काही सापडत नाही...
✍ तुषार सुरेश पाटोळे(Sai)-
I'm Silent,Simple Person....✍❤
🛠MECHANICAL ENGINEERING STUDENT..
... read more
प्यार का रंग हमने युही उन्हें लगा दिया,
उन्होंने उस दिन से हमे देखना बंद कर दिया...
काश उस दिन होली का त्यौहार होता...!!!
✍ तुषार सुरेश पाटोळे(Sai)
-
मूक मूक रडत होतो आवाज
कोणी ऐकलाच नाही,काळजातले घाव
भरत होतो जख्मा कोणी पाहिल्याचं नाही...
मनातलं ओझं विसरायला खांदा
शोधत होतो पण कोणी भेटलंच नाही,
खरं प्रेम शोधत होतो कोणी प्रेम
करणारं भेटलंच नाही...
आठवणींना विसरत होतो डोळ्यातले
अश्रू कोणी पुसलेच नाही,मुक मुक रडत होतो
आवाज कोणी ऐकलाच नाही...
✍ तुषार सुरेश पाटोळे(Sai)-
माय काड्या गोळ्या करून
आणायची तेव्हा रात्री चुल पेटत होती,
चतकोर कोरडी भाकर पाण्यासोबत खाऊन
माय शांततेत निजत होती...
बापाचं छप्पर डोक्यावरून कधीच
उडून गेल होत मायेनं माझ्या बापाची
जागा घेतली होती,एकटीच माझी माय
भल्या मर्दा सारखी राबताना मी उघड्या
डोळ्यांनी पाहिली होती...
✍ तुषार सुरेश पाटोळे(Sai)-
दिल के किताब का हर एक
पन्ना आज बारी बारी से पलट रहा था,
कई दिनों बाद याद उनकी आयी थी और
अकेला दिल आज फिरसे रो पड़ा था...
✍ तुषार सुरेश पाटोळे(Sai)-
पाहून घेतली माणुसकी
जेव्हा खरा सिक्का खोटा ठरला,
डाव मांडला होता आयुष्याचा
पण नशिबाचा एक्का साला बेईमान ठरला...
✍ तुषार सुरेश पाटोळे(Sai)-
सोडून गेला आत्मा देह
काळी रात्र ती वैरी होऊन गेली,
पडली होती माणुसकी दारात
म्हणून लाकडं ती सरसर जळून गेली...
झाकून ठेवली मुठ जेव्हा आपलीच
माणसं परकी होऊन गेली,
सोडून गेला आत्मा देह
म्हणून अश्रुंही कोरडे होऊन गेली...
✍ तुषार सुरेश पाटोळे(Sai)-
शांत निजलो होतो त्या
लाकडांवर क्षणात आग पेटली,
जळत्या माझ्या प्रेताची
राख हवेत उडून गेली...
स्वप्नंसारी पाहिली होती
तीही जगायची राहून गेली,
रडून गेली पुतळे सारी
आग ती विझून गेली...
✍ तुषार सुरेश पाटोळे(Sai)-
जख़्म अभी भी वैसे ही हे
तुम चाहो तो पिछेसे वार करलो,
जल रही हे चिता मेरी
तुम भी हात सेखलो,
छुपा लिये हे आँसू मेने
तुम चाहो तो आँखे मेरी देखलो,
दिल के हर एक जख़्म पुराने हे
तुम चाहो तो सीना फाड़के देखलो...
जल रही है चिता मेरी
तुम भी हात सेखलो....
✍ तुषार सुरेश पाटोळे(Sai)-
तुला चोरून पाहतांना मी
माझं मन गहाण ठेवले होते,
तू क्षणात नजरेचा खेळ खेळत होतीस
आणि मी मात्र त्यावेळी माझे
डोळे मिटून घेतले होते...
तुला आनंदात पाहतांना मी
माझे दुःख बाजूला ठेवले होते,
तू हसत होतीस गालात आणि ते
चित्र मी माझ्या नजरेत कैद केले होते...
तुला आठवतांना मी माझे
हृदय जाग ठेवले होते,
बोलावं तुला मनातलं म्हणून
मी पत्रं प्रेमाचे लिहिले होते...
देशील तू उत्तर त्या पत्राचं
असं मनाला माझ्या वाटले होते,
कित्येक दिवस वाट पाहिली मी
त्या पत्राची शेवटी ते पोस्ट ऑफिसही
बंद झाले होते...
✍ तुषार सुरेश पाटोळे(Sai)-