Tushar Patole  
401 Followers · 236 Following

read more
Joined 13 July 2017


read more
Joined 13 July 2017
15 JUN 2020 AT 22:58

में जोर से आवाज लगाऊंगा

क्या मेरी आवाज तुम तक पोछ पाएगी ,

और आज कल कुछ ज्यादा ही

हँसता रहता हूं में ,

जरा सुनो क्या मेरी हँसी मेरा दर्द

युही छुपा पाएगी ...

-


8 MAY 2018 AT 11:49

गोड गोड माया तुझी
प्रेमळ तुझं मन गं,
हुंदक्यान भरलेलं काळीज तुझं
तरी चेहऱ्यावर सुखं तुझ्या गं...
करुनी काडीमोडीचा सौंसार
कपाळावर कुंकू तुझा महान गं,
तुझ्या दुःखाच्या किती आहेत वाटा
तरी तुझं मन किती महान गं...
गोड गोड माया तुझी
प्रेमळ तुझं मन गं,हुंदक्याने भरलं
काळीज तुझं तरी चेहऱ्यावर
सुखं तुझ्या गं...

✍ तुषार सुरेश पाटोळे(Sai)

-


31 AUG 2017 AT 21:22

गुलाबाच्या फुलाला प्रेमाचं प्रतीक
असं म्हणतात,पण जेव्हा पाकळ्या
त्याच्या वेगळ्या होतात तेव्हा
दुःख त्याला होत...
का त्याला दुःख होत,थोडं तरी
त्याचं मूल्य समजायला तिने हवं होतं...
साधंसुध फुल त्याच,त्याला हि
त्याच्याही काही अपेक्षा होत्या,
एका क्षणात हृदय एकटं झालं त्याच,
यालाच तर ह्या जीवनाची रीत म्हणतात...

तुषार पाटोळे

-


20 AUG 2017 AT 15:12

सोसाट्याचा वाऱ्याला दिशा नाही कळत,
वाहत असतो मंद वारा त्याला त्याचा
थंडावाच नाही कळत...

चिखलात उमललेल्या कमळाला
त्याची सुंदरता नाही कळत,पण काय
वैशिष्ट्य आहे त्याच चिखलात उमळण्याचं
हेच त्याला नाही कळत...

जीवनाच्या वळणावर चालताना त्याला
त्याचा रस्ताच नाही कळत,भटकलेल्या
हृदयाला पुढे रस्ता आहे की दरी
हेच त्याला नाही कळत...

तुषार पाटोळे

-


15 AUG 2017 AT 20:42

एकट्या माझ्या हृदयाला,
तू कधी जवळून बघितलं का ग,
आस लागली मनाला तुझ्या येण्याची
हे तुला कळालं का ग...

रडणाऱ्या माझ्या मनाला,
तू कधी हासवलंय का ग,
एकटा आहे या आयुष्यात हे तुला
अजून जाणवलं नाही का ग...

स्वप्न पाहतो रोज तुझ्या येण्याची,
हे तुला कळतंय का ग,रोज तुझ्या प्रेमाच्या
आठवणीत मारतोय हे तुला
का कळत नाहीये ग...

तुषार पाटोळे

-


15 AUG 2017 AT 10:57

स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांनी,
लढताना भीती दूर केली त्यांनी,
स्वातंत्र मिळावं म्हणून गुलामीचा पहाड
फोडला त्यांनी, लढता लढता बलिदान देल त्यांनी,
सलाम त्या क्रांतिकारी थोर पुरुषांना,
त्यांनी या देशाला आझादी मिळून दिली....

तुषार पाटोळे

-


14 AUG 2017 AT 20:20

तू दिलेल्या नकाराला मी माझा
होकार समजला होता, माहित नव्हतं
मला त्यात तुझ्या प्रेमाचा इशारा
मला जाणवत होता...

हरवलेल्या तुझ्या मनाला,मीही त्या
प्रेमाचा जगात सापडण्याचा प्रयत्न
केला होता,पण माहित नव्हतं मला त्या
जगात हृदयांचा व्यापार हा चालू होता...

साध्या भोळ्या तुझ्या हृदयाला,
मी माझ्या हृदयात सामावण्याचा
प्रयत्न केला होता,पण तुझ्या डोळ्यांना
खरं प्रेमच कुठे दिसत नव्हतं...

तुषार पाटोळे

-


6 AUG 2017 AT 21:53

मैदानावर खेळायला कोणाकडे
वेळच नसतो,पण हृदयांशी खेळायला
इथे वेळच कमी पडत असतो...

एकसोबत जगायला कोणी तयारच नसतं,
पण क्षणाक्षणात एकटं हृदय तोडायला
इथे सगळ्यांना जमत असतं...

कोमजलेल्या मनाला हासवायला जमत नसतं,
पण एकट्या त्या रडक्या आठवणींना
रडवायला इथे प्रत्येकाला जमतं...

कोमजलेल्या झाडाचे फुल तोडायला जमतं,
पण त्याची काळजी करायला कोणालाच
जमत नसतं,कारण इथे प्रत्येकाला
एकमेकांच्या हृदयाशीच खेळायला
जमत असतं...

तुषार पाटोळे
(०५/०८/२०१७)

-


31 JUL 2017 AT 22:01

क्षणात काही माणसं येतात आयुष्यात,
थोडं त्यांचं मन लागावं म्हणून किंवा थोडं
मनातलं ओझं हालक व्हावं म्हणून,पण थोडेही ते
हृदयात रमले कि त्यांना त्या दुसऱ्या मनाची चाहूल लागते,
आणि म असेच ते पहिल्या माणसांना दुराऊन टाकत असतात
पण नको आहे ती क्षणाची आपुलकी आम्हासारख्याना, हवं आहे तर फक्त तुमचं प्रेमळ हृदय आणि प्रेमानं बोलणं बस बाकी काही नको आम्हाला या आयुष्यात...

तुषार पाटोळे

-


27 JUL 2017 AT 19:44

जेव्हाही कोणाच्यातरी आधाराची गरज असते
तेव्हा सगळेच लांब निघून जातात,
एकटेपणाची ते जणूकाही एक प्रकारे
शिक्षाच भोगत असतात....
मोकळ्या त्या वातावरणात स्वप्नांना
दिशा दयाची असते,सोबत नसताना कोणी
जगणं विसरून जावेसे वाटतें...

तुषार पाटोळे
(२७/०७/२०१७)

-


Fetching Tushar Patole Quotes