एक तू अन् एक मी , असे नाते फार होते
जे कधी तुटलेच नाही, दोन माझे यार होते
एक होता संपलेला, तुटलेल्या ताऱ्या प्रमाणे
तोच होता एक ज्याचे उजेड जोरदार होते-
ऐ कलम ,
एक आरज़ू जो दिल में है
सुकून भरा जो तुझमें है
है दास्ताए ... read more
इथे प्रत्येक सत्याचा घात झाला आहे
राजकारण करूनच सगळीकडे संवाद झाला आहे
अन् मी रिपोर्ट टाकतो, 'माणुसकी' हरवल्याचा
माझा शक आहे, कोणी तरी माझाच गद्दार झाला आहे ...-
मित्राशी बोलताना वेळ कधी संपू नये
गळाभेट घेतांना मधे कोणी येऊ नये
आणि उध्दार व्हावा दुनियेतील सर्वच मित्रांचा
कुणाला मित्र नसावा , असा एक ही असू नये ...-
आज धर्म बघितला मी , भल्लाचं महान आहे
माझ्या तुझ्यासाठी , आता देश ही लहान आहे
अन् जगू इथे कसा मी , हिंदू मुस्लिम करुनी
जेव्हा शिक्षण-पोटासाठी , मायबाप ही गहाण आहे-
देश विदेश की बातें सारी
देश विदेश का कहना हैं
देखा हमने सारे जहान में
भारत ही एक गहना हैं-
तू दिलेले घाव आहे , जळलेल्या राखेप्रमाणे
हार आहे फुल आहे , मरण्यास मी तय्यार आहे
बस एकदा तू ये जराशी , शेवटाची भेट होईल
पेटलेले स्मशान आता , ते ही साले शांत आहे
( मिटवू सारे वाद आपले , कार्यवाही रद्द करुनी
तू ही आहे मी ही आहे , परत तोच इजहार आहे )-
केसांमध्ये माळून गजरा, मन मोगऱ्याचे झाले
मन हे मलाच कळले नाही , ते ही दुसऱ्याचे झाले-
प्रिय मी ,
ती ऊब होती सोबतीला. बहुतेक त्या सुर्यातील आगिप्रमाने, कधी न समजून घेणाऱ्या उद्रेकाची असेल . ज्या मध्ये माझा मी असताना ही 'शुन्या' प्रमाणे जगणाचे आणि झिजण्याचे कारणे शोधून शोधून स्वतःशीच स्वतःसाठी स्वातंत्र्याचा लढा लढवीत होतो. स्वतःला मारून पेटवून स्वतःचीच राख एका कोरड्या पडलेल्या नदी मध्ये सार करीत होतो. स्वतःला शत्रू पलीकडे समजून, एकांतात कुठे तरी काळोख बघून, अतिशय प्रेमाने आपल्याच हृदयात खंजिराने वार करायचे. मग काय आपणच केलेल्या गुन्ह्यांवर ठामपणे मनाच्या कटघर्यात उभे राहून न्याय मागत सुटायचे ( फक्त हातातील रक्त कोणाला दिसू नये ). असेच आपल्यातील असंख्य विचारांची हत्या करायची, मनाचा आणि विचारांचा संबंध तोडून टाकायचा परत स्वतःचा उद्रेक होई पर्यंत ...-
काहीच नसतो सार, त्या कर्कश 'प्रवाहात'
फक्त दुःखाने समजून घ्यावे, सुःखाच्या 'प्रवासात'-