आईपण अनुभवतांना
बायकोपण जपतांना
रात्रीचा दिवस करतांना
काट्यांमध्ये वेळेच्या अडकु नकोस
तु स्वतःला विसरू नकोस
हक्क गाजत असतांना
जबाबदाऱ्या तोलतांना
हास्य तुझे हरवु नकोस
तु स्वतःला विसरु नकोस
गडबड गोंधळ सारा सावरतांना
फापट पसारा आवरतांना
विश्रांती थोडी दवडू नकोस
तू स्वतःला विसरु नकोस
मुलगी, बायको, सुन ,आई
कर्तव्याची नाती सारी
हाक येताच अंगात बळ आणणारी
तरीही अस्तित्व तुझे नाकारु नकोस
तु स्वतःला विसरु नकोस...-
Music lover..🎶
Words are the medium to express myself...!!!
I write better than I speak read more
मी फक्त ठिपका गर्दीतला
पाऊलखुणा पुसट पुसट
गर्दीत हरवतो
प्रवाहात वाहतो
ओळख स्वतःची स्वतःला देत
नजरा चुकवत
मान हलवत
पावले मोजत
वाट हरवत
दिशा गवसत
काळाच्या गतीने चालत आहे
चालतोच आहे..
मी फक्त ठिपका गर्दीतला...-
फेसाळलेला समुद्र ,शहारणारा वारा
रेताड ओला स्पर्श
आणि क्षितिज डोळ्यात न सामावणारा
अगदी तसंच नाही
पण तसच काहीतरी..
नजर जाईल तिथे डोंगररांगा द्रुत लयीत श्वास
तोल अडखळणारा
पलिकडे सुर्य अलगद लपणारा
आणि संधिप्रकाश आसमंत उजळणारा
अगदी तसंच नाही
पण तसचं काहीतरी..
चांदण रात्र सोबतीला थंडी बोचणारी
निरव शांतता मनी झिरपणारी
आणि मैफिल एकांताची हवीशी वाटणारी
अगदि तसंच नाही
पण तसचं काहीतरी..
जगापासुन दुर स्वतःपासुन थोडं जवळ
जाणिव क्षणभंगुरतेची
आणि "मी" निसर्गाच्या कवेत हळुच विरणारा
अगदी तसंच नाही
पण तसचं काहीतरी...-
जे हाती उरणारच नाही
त्याचा अट्टहास का?
फक्त मनाला रुचणारे
आभास का?
वस्तुस्तिथी मानण्यात कमीपणा का?
द्वंद्व विचारांचे उगाच का?-
आजीच्या परीकथेसारखा गोड शेवट
अजुन काय हवं?
मायेच्या माणसांची सोनेरी ऊब
अजुन काय हवं?
निरव शांततेत रात्रीची गाढ झोप
सुर्योदयासोबत उमलणारी सुखाची पाकळी
अजुन काय हवं?
गेल्या दिवसांचा जमवलेला आनंद आणि नव्या दिवसाचं समाधान नवं
अजुन काय हवं?
अनुभवांच्या झऱ्यात चिंब व्हाव ,रंगात जिवनाच्या रंगुन जावं
अजुन काय हवं?-
बस बेवजह कही ठहर के भिड को देखते रहना
मंजिलकी परवाह छोडकर चलते रहना
विचारोकी भिड से हटकर बस खामोश रहना
मानकर खुदको एक निर्मल सरीतासा बस बहते रहना-
किसी दिन मुड के देखु जब इस मोड को
चेहरे पर मुस्कान फिर छलक उठेगी
-