22 JUL 2019 AT 14:31

आज तुझे ते टोचून बोलणे
लेखणीनेही मनावर घेतले
खंजिरीसारखे वार तिने
त्या पानावर केले
लिखाण आता झाले
होते शब्दबंबाळ
कारण शब्दांची आता
होती भावनांशी नाळ

- तेजल भोईटे शेलार ✍️