ओठांपेक्षा बोलकं असतं
पाणावलेल्या डोळ्यांचं बोलणं॥
सर्वांनाच कुठे जमतं सावली
देण्यासाठी स्वतः ऊन झेलणं॥-
नातं नसले तरी बंधन हवे
भेट नसली तरी संवाद हवा...
डोळ्यातील त्या भावनांना
फक्त अबोल हुंकार हवा...-
कमजोर नातं..
प्रेमाचे दावे आज संपून गेले
तुझे सारे वचन आज सुटुन गेले
घमंड असायचा मला खूप तूझ्या प्रेमावर
तुझ्या सविचे नाते आज विरुन गेले
कमजोर प्रेमाचे नाते कुठ टिकले कोणाचे
आज सर्व जगाला तू कळून दिले
आज कोणते पुरावे दाखवावे कुणाला
हसत हसत तू काळजातून वार केले
गेलेले दिवस आज नको आठवू
साऱ्या आठवणींनि घायाळ आज मन केले
शोधावा कुठे सहारा या क्षणि कोणाचा
अपल्यांनिच आज बेसहारा केले....-
मित्रा❣️😘
आपल्या प्रेमाचं गुपित मित्रा
कागदावर लिहीत बसावं.
फक्त तूझ्या- माझ्या नात्याचं
अस्तित्व त्यात असावं..../
मी फुलाची पाकळी
तर तू त्याचा गंध व्हावं.
अख्ख्या विश्वात न सामावणारं
सुख तुझ्या वाट्याला यावं..../
मी तुला आठवता क्षणी
तू डोळ्यांसमोर दिसावं.
व्याकुळ माझ्या मनास
तू क्षणात फुलवाव..../
पावसाचे थेंब होऊन
माझ्यावर तू बरसावं.
तर कधी गुलाबी थंडी
होऊन अंग माझं शहारावं..../
काट्यांनी तुला पाहून
फुलांत रूपांतरित व्हावं
मोठ्या- मोठ्या वादळांनी
नतमस्तक तुझ्यापुढे व्हावं..../
हृदयाच्या कोपऱ्यामध्ये
नेहमी तुला मी जपावं
शिंपल्यातील मोत्यासारखं
आयुष्य तुझं घडावं..../
(पूर्ण कविता कॅप्शन मध्ये वाचा)-
जीवनात अनेक काटे टोचतील
त्यांना सहन करता यावं.
मनी वेदना असूनही
मनसोक्त बहरता यावं......
निराश झालास कधी तर
स्वतः च स्वतःला धीर द्यावा.
संकट समयी शत्रुलाही
मदतीचा हात द्यावा....
आयुष्यात आपुलकीचा
गंध नेहमी दरवळावा.
अहंकाराचा दुर्गंध त्यात
जरा सुद्धा नसावा....
अडखळले कधी पाय
तर त्यांना खंबीर बनवाव.
फाटले असेल हृदय कुठे
त्यास अलगद शिवून घ्यावं....
प्रयत्नांना फळ न मिळाल्यास
मनात हुरहूर न बाळगावी.
सर्व काही विसरून पुनः
नव्याने सुरुवात करावी....
उंच आकाशी उडूनही
पाय जमिनीवर ठेवता यावे.
आयुष्याच्या आखाड्यातील
शूरवीर तुला होता यावे.....
-shrinuta ✍️-
प्रेम आयुष्यात आल्यावर.....❤️💝💫
प्रेम आयुष्यात आल्यावर
जगणं मात्र बदलून जातं.....
सर्वस्व ओवाळून टाकावं
इतकं कुणी आवडून जातं.....
दोन आत्म्यांच मिलन
प्रेम भेटता होऊन जातं.....
ज्याला भेटतो प्रेमाचा अनुभव
त्यालाच प्रेम कळून जातं......
बाकीच्यांच्या लेखी प्रेम म्हणजे
वेड्यांचं जग होऊन जातं.....
❤️❤️❤️
-
*आई*
क्षणोक्षंणी आई बघ
कशी तुला आठवते
तुझी सुंदर प्रतीमा
डोळ्यांत मी साठवते
ओढ तुझी बघ ना ही
मला रोजच लागते
घेशील का मीठीत तू
खूप छान ग वाटते
कळणार काय आहे
तुझ हे प्रेम माऊली
नसताना समजेल
मग कुठे ग सावली
स्वप्न मनात माझ्या
तुझे गुजच सांगते
नको दूरचे राहणे
आई पोरके वाटते
तू आहे ना तोपर्यंत
तुझा सहवास हवा ग
लोभसवाणा चेहरा
किती वाटे हेवा ग.....-
दुनियादारी शिकता येत नाही
मायेच्या कुशीत राहून
आधी जग बघावं लागतं
गावच्या वेशीबाहेर जावून
🌻🌻🌻🌻-
जगासाठी जो झिजतो ;
तोच रूप ईश्वराचे ....
काय असावे मोठेपण ;
याहून माणसाचे....
- किशोर बळी-