QUOTES ON #सागरलाट

#सागरलाट quotes

Trending | Latest
29 NOV 2020 AT 18:55

#सागरलाट..
फेसाळ लाटा मागे फिरुनी सोडी किनारी नक्षी..
दिसता मासा पाण्यावरला झेपावे सारसपक्षी..
दूर कुठे हेलकावे घेई एक शिडाची बोट..
अनवाणी पायी स्पर्शून जाई एकेक सागरलाट..
किना-यातील वाळूत रुतले शंख-शिंपले, मोती..
पाऊलखुणा सोडून गेली कासवपिल्ले छोटी..
स्तिमित होऊनी विसावा घेण्या अडली पुढली वाट..
अनवाणी पायी स्पर्शून जाई एकेक सागरलाट..
निवांत पडूनी ऐकत जावे लाटांचे गहिरे गान..
पिसाटल्यागत उडवी वाळू वारा असा बेभान..
नजर फिरता सभोवार दिसे माडांचे बन घनदाट..
अनवाणी पायी स्पर्शून जाई एकेक सागरलाट..
सोनकिरणे घेऊनी चालला तेजस्वी सूर्यगोल..
शीतल चांदणे नभां पसरते षष्ठीची चंद्रकोर..
दृश्य ते अनुपम, सुंदर सारे साठवून घेई डोळ्यांत..
अनवाणी पायी स्पर्शून जाई एकेक सागरलाट..
संथ संथ त्या लाटांवरती कोळी पसरतो जाळे..
कधी निसटती, कधी अडकती, काही हुशार, गबाळे
चंचल मनाला ओढ लावूनी फसवी मोहजालात..
अनवाणी पायी स्पर्शून जाई एकेक सागरलाट..
भरती-ओहोटीप्रमाणे चाले अपुलेही जीवनगाणे..
कळत नकळत वेचिले जाती सुखदु:खांचे दाणे..
रिते करुनी शब्द काहीसे, काही ठेवी हृदयात..
अनवाणी पायी स्पर्शून जाई एकेक सागरलाट..
सागरतीरी या विसावलो आयुष्याच्या सांजेला..
कुणा सांगू अन् कसे सांगू मी जीव असा हा लाजेला..
पैलतीराची ओढ लावूनी तरंग उठे त्या जळांत..
अनवाणी पायी स्पर्शून जाई एकेक सागरलाट..
- © आनंद M. मालशे

-


17 JUL 2022 AT 22:14

#सागरलाट

फेसाळ लाटा मागे फिरुनी सोडी किनारी नक्षी, दिसता मासा पाण्यावरला झेपावे सारसपक्षी
दूर कुठे हेलकावे घेई एक शिडाची बोट, अनवाणी पायी स्पर्शून जाई एकेक सागरलाट
किनाऱ्यातील वाळूत रुतले शंख-शिंपले, मोती, पाऊलखुणा सोडून गेली कासवपिल्ले छोटी
स्तिमित होऊनी विसावा घेण्या अडली पुढली वाट, अनवाणी पायी स्पर्शून जाई एकेक सागरलाट

निवांत पडूनी ऐकत जावे लाटांचे गहिरे गान, पिसाटल्यागत उडवी वाळू वारा असा बेभान
नजर फिरता सभोवार दिसे माडांचे बन घनदाट, अनवाणी पायी स्पर्शून जाई एकेक सागरलाट
सोनकिरणे घेऊनी चालला तेजस्वी सूर्यगोल, शीतल चांदणे नभां पसरते षष्ठीची चंद्रकोर
दृश्य ते अनुपम, सुंदर सारे साठवून घेई डोळ्यांत, अनवाणी पायी स्पर्शून जाई एकेक सागरलाट

संथ संथ त्या लाटांवरती कोळी पसरतो जाळे, कधी निसटती, कधी अडकती, काही हुशार, गबाळे
चंचल मनाला ओढ लावूनी फसवी मोहजालात, अनवाणी पायी स्पर्शून जाई एकेक सागरलाट

भरती-ओहोटीप्रमाणे चाले अपुलेही जीवनगाणे, कळत नकळत वेचिले जाती सुखदु:खांचे दाणे
रिते करुनी शब्द काहीसे, काही ठेवी हृदयात, अनवाणी पायी स्पर्शून जाई एकेक सागरलाट

सागरतीरी या विसावलो आयुष्याच्या सांजेला, कुणा सांगू अन् कसे सांगू मी जीव असा हा लाजेला
पैलतीराची ओढ लावूनी तरंग उठे त्या जळांत, अनवाणी पायी स्पर्शून जाई एकेक सागरलाट

- © आनंद M. मालशे
शुक्रवार १५ जुलै २०१६

-


17 MAY 2020 AT 13:10

#सागरलाट

फेसाळ लाटा मागे फिरुनी सोडी किनारी नक्षी.. दिसता मासा पाण्यावरला झेपावे सारसपक्षी..
दूर कुठे हेलकावे घेई एक शिडाची बोट.. अनवाणी पायी स्पर्शून जाई एकेक सागरलाट..

किनाऱ्यातील वाळूत रुतले शंख-शिंपले, मोती.. पाऊलखुणा सोडून गेली कासवपिल्ले छोटी..
स्तिमित होऊनी विसावा घेण्या अडली पुढली वाट.. अनवाणी पायी स्पर्शून जाई एकेक सागरलाट..

निवांत पडूनी ऐकत जावे लाटांचे गहिरे गान.. पिसाटल्यागत उडवी वाळू वारा असा बेभान..
नजर फिरता सभोवार दिसे माडांचे बन घनदाट.. अनवाणी पायी स्पर्शून जाई एकेक सागरलाट..

सोनकिरणे घेऊनी चालला तेजस्वी सूर्यगोल.. शीतल चांदणे नभां पसरते षष्ठीची चंद्रकोर..
दृश्य ते अनुपम, सुंदर सारे साठवून घेई डोळ्यांत.. अनवाणी पायी स्पर्शून जाई एकेक सागरलाट..

संथ संथ त्या लाटांवरती कोळी पसरतो जाळे.. कधी निसटती, कधी अडकती, काही हुशार, गबाळे..
चंचल मनाला ओढ लावूनी फसवी मोहजालात.. अनवाणी पायी स्पर्शून जाई एकेक सागरलाट..

भरती-ओहोटीप्रमाणे चाले अपुलेही जीवनगाणे.. कळत नकळत वेचिले जाती सुखदु:खांचे दाणे..
रिते करुनी शब्द काहीसे, काही ठेवी हृदयात.. अनवाणी पायी स्पर्शून जाई एकेक सागरलाट..

सागरतीरी या विसावलो आयुष्याच्या सांजेला.. कुणा सांगू अन् कसे सांगू मी जीव असा हा लाजेला..
पैलतीराची ओढ लावूनी उठे तरंग त्या जळांत.. अनवाणी पायी स्पर्शून जाई एकेक सागरलाट..
© आनंद M. मालशे

-