You have a fresh mind & pure soul..
-
#सागरलाट
फेसाळ लाटा मागे फिरुनी सोडी किनारी नक्षी, दिसता मासा पाण्यावरला झेपावे सारसपक्षी
दूर कुठे हेलकावे घेई एक शिडाची बोट, अनवाणी पायी स्पर्शून जाई एकेक सागरलाट
किनाऱ्यातील वाळूत रुतले शंख-शिंपले, मोती, पाऊलखुणा सोडून गेली कासवपिल्ले छोटी
स्तिमित होऊनी विसावा घेण्या अडली पुढली वाट, अनवाणी पायी स्पर्शून जाई एकेक सागरलाट
निवांत पडूनी ऐकत जावे लाटांचे गहिरे गान, पिसाटल्यागत उडवी वाळू वारा असा बेभान
नजर फिरता सभोवार दिसे माडांचे बन घनदाट, अनवाणी पायी स्पर्शून जाई एकेक सागरलाट
सोनकिरणे घेऊनी चालला तेजस्वी सूर्यगोल, शीतल चांदणे नभां पसरते षष्ठीची चंद्रकोर
दृश्य ते अनुपम, सुंदर सारे साठवून घेई डोळ्यांत, अनवाणी पायी स्पर्शून जाई एकेक सागरलाट
संथ संथ त्या लाटांवरती कोळी पसरतो जाळे, कधी निसटती, कधी अडकती, काही हुशार, गबाळे
चंचल मनाला ओढ लावूनी फसवी मोहजालात, अनवाणी पायी स्पर्शून जाई एकेक सागरलाट
भरती-ओहोटीप्रमाणे चाले अपुलेही जीवनगाणे, कळत नकळत वेचिले जाती सुखदु:खांचे दाणे
रिते करुनी शब्द काहीसे, काही ठेवी हृदयात, अनवाणी पायी स्पर्शून जाई एकेक सागरलाट
सागरतीरी या विसावलो आयुष्याच्या सांजेला, कुणा सांगू अन् कसे सांगू मी जीव असा हा लाजेला
पैलतीराची ओढ लावूनी तरंग उठे त्या जळांत, अनवाणी पायी स्पर्शून जाई एकेक सागरलाट
- © आनंद M. मालशे
शुक्रवार १५ जुलै २०१६-
ही वाट चांदण्यांची
त्याला नक्षत्रांची जोड..
चंद्र पाहतो ढगांआडूनी
हसतो गालामध्ये गोड..
शिंपीत जाते हळूहळू
चांदणे गुलाबी हलके..
बंध जुळती प्रीतीचे
शब्दाविना बोलके..-
तो पता चलेगा,
लोगों में अपनी पहचान बनाने के लिये
खुद को कितनी मेहनत करनी पडती है...-
Us to make changes in ourselves..
Positive things do happen,
if we move and progress
along with time..-
which can be achieved anytime, anywhere..
Just we need the correct perception.. Isn't it?-
जब इंसान जिंदा हो तो किसी को कदर नहीं..
जब याद आये बीते पल, तब वक्त कभी रुकता नहीं..-
बदलती रहती है..
ये कोई नहीं जानता..
की कल आज जैसी रात होगी या नहीं..-