#बालपण_माहेरच
पाऊस मनातून कोसळला...
नी डोळ्यातून उसळला!!
गंगा यमुना रित्या झाल्या...
नी पापण्याही ओलावल्या!!
हुंदका उमाळून आला...
नी माहेरी जीव विसावला!!
तन जरी होते सासरला...
तरी मन गुंतले माहेरला!!
केसातली वेणी-फणी...
शेतातल्या पाटातले पाणी!!
घरामागची पसरलेली परसबाग...
दूर कुठेतरी ओरडणारा वाघ!!
माटवावरच्या जाई-जुईच्या वेली...
नी खुणावणारी अबोल आबोली!!
खुण ओळखीची वाटेवरी...
पायवाट नकळत पोहोचवे घरी!!
हंबरणारी गोठ्यातली गाय...
आईच्या पान्ह्यानंतर दुधावरची साय!!
मागच्या दाराची न्हाणी...
सांजवेळीस आंघोळीचे पाणी!!
पश्चिम क्षितिजावर कातरवेळ...
तुलसी वृंदावनाची दिप वेळ!!
आठवणीतलं सार काही...
बालपण माहेरच पुन्हा न येई!!
श्री.गजानन परब(बाबू_G) , सिंधुदुर्ग.
२१०५२०२२
-
21 MAY 2022 AT 13:08