#नाखवा... #
समुद्राच्या लाटे बरोबर
दौलत रात्रंन दिवस काम
करतात ते म्हणजे नाखवा....
चक्रिवादळ येऊ दे किंवा
कमी दाबाचा पद्टा निर्माण
होऊदे तरी जिवाची पर्वा न
करता आपली कामे जोमाने
करतात
ते म्हणजे नाखवा....
सन आयलाय गो नारली
पुनवेचा म्हणत सण साजरा
करतात आणि नव्या जोमाने
पुन्हा कामाला लागतात
ते म्हणजे नाखवा....
एक आठवडा असो किंवा
एक महिना असो खोल
समुद्रा मध्ये जाऊन मासे
मारी करतात
ते म्हणजे नाखवा....
जसे सैनीक सिमेवर रांत्रंन दिवस
पाहरा देत देशाचे रक्षण करतात
तसच
जीवाची पर्वा न करता खोल
समुद्रामध्ये जाऊन मासे मारी
करतात
ते म्हणजे नाखवा....
त्यांचा व्यवसायच मुळी
जणू मासे मारी त्यावर त्यांच
रोजच पोट भरत असतात
ते म्हणजे नाखवा....
पक्षी कसे आभाळात उंच
भलारी घेतात त्याच्या कडे
पाहिल्यावर आनंद मिळतो
तसच नाखवा मासे मारी
करतात तेव्हा उंच आभाळात
जाळ फेकताट तेव्हा ते
आपोआप समुद्राला वंदन
करतात तेव्हा वेगळाच
आनंद जणू आपल्याला
पाहायला मिळतो तो
आनंद आपल्याला देतात
ते म्हणजे नाखवा...
@ कपिल पेंडसे, मुर्डी-
26 MAY 2021 AT 17:47