QUOTES ON #तुझीआठवणयेतेतेंव्हा

#तुझीआठवणयेतेतेंव्हा quotes

Trending | Latest

#तुझीआठवणयेतेतेंव्हा

तुझी आठवण येते तेंव्हा,
मनडोही या तरंग उठती..
क्षण अगणित ते सुख-दु:खाचे,
मनी-मानसी दाटुन येती...!
आठवणींचा सुखद स्पर्श तो,
गर्भ रेशमी तलम मुलायम...
कधी होतसे दाह विखारी,
कधी वेदना दु:ख विदारक...!
तुझी आठवण येते तेंव्हा,
देह परिमळे चंदनगंधी..
स्मरणकुपीतून अत्तर सांडे,
दरवळ तो अंतरी सुगंधी...!

( # वृत्त #पादाकुलक
#गोदातीर्थ )
डॉ.सौ.वैशाली गोस्वामी-कुलकर्णी

-