QUOTES ON #काव्यात्मकअंकुर

#काव्यात्मकअंकुर quotes

Trending | Latest

तथ्य

स्वार्थी या जगात हक्काचं घास घेणं देखील शक्य नाही
पण न लढता वाट शोधणे या जगण्याला देखील तथ्य नाही

#काव्यात्मकअंकुर🌱

-



उत्तर

प्रत्येक प्रश्नाला उत्तर हवे
पण नको कोणते प्रश्न नवे
आज दिसेल एकटा पक्षी तर
उद्या कदाचित दिसेल एकत्र थवे

#काव्यात्मकअंकुर🌱

-



खोली

घुटमळतोय अडगळीत श्वास माझा
गोड ना वाटे मजला घास माझा
नाही अडचणीत कोणत्या
पण तरी त्रास वाटे
एका खोलीतला जीवनप्रवास माझा


#काव्यात्मकअंकुर🌱

-



पाखरे

वाट परतीची धरत येतात फिरुनी
पाखरे घरट्याकडे आपल्या
माफी द्यावी आले जर कोणी परतूनी
शेवटी निघून जातात खपल्या

#काव्यात्मकअंकुर🌱

-



ठामपत्ता

लपंडाव म्हणावं की खेळ गुंतागुंतीचा
ठाव लागत नाही की अभाव हा संगतीचा

#काव्यात्मकअंकुर🌱

-



मिलन

खुले केले दालन शब्दांचे
करतील भावनिक स्पर्श हे मिलन दोघांचे

#काव्यात्मकअंकुर🌱

-



"मान्सूनच्या महिन्यातील धमाल"

Read in Caption

#काव्यात्मकअंकुर🌱

-



जसे विचारल्याशिवाय कोणी सांगायला येत नाही
तसे विसरल्याशिवाय कोणी उकसायला येत नाही

#काव्यात्मकअंकुर🌱

-



कोडे

कोडे हे विचारांचे भावनांना गुंतवत राही
नकळतपणे निर्मित झालेल प्रेम स्वस्थ बसवत नाही

#काव्यात्मकअंकुर🌱

-



भोलाशिवशंकर

रूद्र अवतारी तू देव माझा
भोला तू शिवशंकर !!
भक्ती तुझ्यावरती माझी राहिलं निरंतर
चित्तीं पाहिलं रूप तुझे सदा
नाही पडणार कधीच अंतर !!

#काव्यात्मकअंकुर🌱

-