ती
ती आशेचा किरण
ती परंपरेची स्मरण
ती जबाबदारीची आठवण
ती प्रकृतीच दर्शन
ती शृंगारिकतेचं प्रदर्शन
ती नव्या चाहुलीचं आकर्षण
ती कळी कोमल
ती भविष्य उज्ज्वल
ती प्रेरणा यशाची
ती गाथा संघर्षाची
ती उत्तर प्रश्नांची
ती दिशा स्वप्नांची
-
सर्व स्वलिखित
चारोळ्या✍️लेख❤️
कविता✍️शेरोशायरी❤️
#काव्यात्मकअंकु... read more
कोई रवैया न होता इनका,
पर इनमें छुपे आगाज होते हैं
इनसे बने इम्तियाज होते हैं
इनमें लिपटे लिहाज होते हैं-
नातं
लिखाणाची आवड मला
मनी काही साचवत नाही
दडले आहे आत माझ्या दुःख
माझ्या लेखणीला सारं काही दाखवत नाही
सार लिहीतो भावनांचा मी
शब्दांवर खार खात नाही
भार आहे जीवनाचा खूप
कोणाचा आधार राहत नाही
अपार कष्टाची तयारी आहे
दिवस की रात्र हे पाहत नाही
कोणावाचून कोणाचं राहत नाही
असं म्हणून इथे चालत नाही
जुळून येते विचारशैली आणि अनुभव
त्याशिवाय लिखाणात मी भर घालत नाही
कोणीतरी सहजपणे नकळत जोडलं जातं
पाणी डोळ्यांतून कोणाच्या उगाच वाहत नाही
-
अनुभूती
वाटेत चालता एक समस्या मला उद्ववली
वाटेतून जाताना सावली तुमची मी अनुभवली
वैचारिकतेच्या कल्लोळाने जेव्हा माझी
जीवनाची ही ईच्छा संपवली
तेव्हा ओढ ही अंतरीची तुम्ही जागवली
माझ्यासाठी सदैव तुम्ही,
नव्या अनुभवांची दिशा उलगडवली
स्वतःलाही मी आता,
'स्वामी' शक्तीची महती समजवली
'स्वामी' कृपेमुळे स्वतःहात उमेद नवी घडवली
स्वामी ॐ म्हणत घडत गेलो
माझी वाट कोणी ना अडवली
माझ्या जगण्याची मजा आणि नाती
माझ्या 'स्वामी' माऊलींनी वाढवली
श्री स्वामी समर्थ!!-
नवी आशा नवी उमेद
पुन्हा नव्याने उमलवूया
नव्या वाटेवर नवी दिशा घडवूया
सोनेरी स्वप्नांची किरणे प्रत्यक्षात उतरवूया
सकारात्मक ऊर्जा आणि कल्पकता
नव्या जोशात साऱ्या जगी पसरुवूया
चिन्हे ओळखून यशाची
सामर्थ्याचे संकेत दर्शवूया
जुन्या स्वप्नांना जोड देऊन
नव्या कोऱ्या वाटेवर
हे आयुष्य बदलवूया-
मराठी भाषा
नको फक्त एकदिवसीय तळमळ
घ्यावी भाषेची महती लावून ताळमेळ
चुकली जर विरामचिन्हें किंवा काना-मात्रा
तर व्हायलाचं हवी जीवाची घालमेल
-
लोचा
थोडक्यात बोलणाऱ्यांचा मुद्दा ठरलेला नसतो,
आणि थोड्या वेळाने सांगणाऱ्यांकडे
काळ ठरलेला नसतो.
इथेच सगळा लोचा होतो.
— % &-
परीक्षा
प्रचितेत असणारी माणसंं
प्रतीक्षा करत नाही.
आणि प्रतीक्षेत असणारी माणसं
प्रचितेत नसतात.
हे ओळखणे एक परीक्षा आहे.-
सूत्र
नसावी चिंता समीकरणाची,
प्रेमाने सूत्र हाती घ्यावी.
नाती 'X' मध्ये बद्दलण्या आधीच;
त्यांना वेळेनुसार किंमत द्यावी.-
पावले
झिजलेत ही पावले चालून!
घ्यायची पुन्हा धाव,
सारे घाव जाणून!
करायचा जोड असा जणू,
तोडणे कठीण आहे,
हेची द्यावे सांगून!-