थोडासा वेडेपणा ...
असावा जगण्यात...
👇👇👇— % &-
💖आवडतं मला तुझ्या स्वप्नात रमायला....🌌
तु माझी आहेस की नाही माहीत नाही मला पण,
आवडतं मला तुला देवाकडे मागायला,
तु नाही मिळणार कधी मला तरीही,
आवडतं मला तुझ्या स्वप्नात रमायला.....
स्वप्नातली स्वप्न परी आहेस तू माझ्या,
वाटत यावं अचानक तुला भेटायला,
तु नाही भेटणार कधी मला तरीही,
आवडतं मला तुझ्या स्वप्नात रमायला....
दिसायला सुंदर आणि तेवढाच छान स्वभाव तुझा,
आवडतं मला तुला लपून बघायला,
तू नाही बघणार माझ्याकडे तरीही,
आवडतं मला तुझ्या स्वप्नात रमायला....
देवाकडे मागण्यापेक्षा आवडेल मला
तुझ्या बाबाकडे तुझा हात मागायला,
कमरेत लात घालतील आणि बाहेर काढतील ते मला
त्यापेक्षा आवडतं मला तुझ्या स्वप्नात रमायला..
मिळालाच जर जन्म नवा तर तुझ्यासोबतच हवा,
अशी प्रार्थना करेल मी कायम देवाला,
ह्या जन्मात नाही भेटणार तू मला तरीही,
आवडतं मला तुझ्या स्वप्नात रमायला....
अक्षय कोळगे (AK)
-
माझ्या हृदयाचा ठोका व्हायला
माझ्या डोळ्यातील नजर व्हायला
माझ्या चंचल मनाला सावरायला
आवडत का तुला? ☺️-