शब्द माझा सखा  
845 Followers · 182 Following

Joined 8 July 2019


Joined 8 July 2019

किती घुटमळतोय जीव काठावर...
तू ओठ तुझे टेकव ना ओठावर....
Rani❤️❤️

-



काय सांगू तीळगुळाच्या प्रेमकहाणीतली गोडी....
तिळासाठी तीळ तीळ झुरते रोज एक वेडी...
Rani❤️❤️

-



विसरून जाऊया न सगळं
माझ्या चुका
तुझा एखादा गुन्हा...
पहिली भेट
समजून आपण
नव्याने
भेटूया ना आज पुन्हा...
Rani❤️❤️

-



ज्याची वाटत होती भीती
तेच
आज पुन्हा घडतंय...
पावसाच्या
अल्लड सरीचं
उनाड
वाऱ्यावर मन जडतंय....
Rani❤️❤️

-



सांजवेळी त्याच्या आठवणीत
रोज
तिचं मन हळवं व्हायचं...
इथं
तिला भरून आलं की
तिथं
त्याच्याही डोळ्यात पाणी यायचं...
Rani❤️❤️

-



आठवतंय मला
अगदी
असंच घडलं होतं...
रात्रभर
तू मिठीत असल्याचं
रात्री मला
स्वप्नं पडलं होतं...
Rani❤️❤️

-



कळत नाही कसली ओढ
अन
कुठले हे नाते...
नाव
तुझे ओठांवर येते
अन
पहाट ही गोड होते...
Rani❤️❤️

-



कधीही कुणाला न समजलेला
तो
कळेल का कधी कुणा...
प्रत्येक
घराचं घरपण
अधुरं
असतं पुरुषाविना...
Rani❤️❤️

-



कितीदा भरून आले डोळे
तरीही
किती सहज पुसतो आपण..
कुणी
कसं चाललंय विचारल्यावर
किती
सहज हसतो आपण...
Rani❤️❤️

-



आहे तसाच राहूदे तुझ्या माझ्यातला दुरावा...
काळोखाने उजेडाचा कुठला द्यावा पुरावा...
Rani❤️❤️

-


Fetching शब्द माझा सखा Quotes