विसरणं हा मुळी पर्यायचं नसतो
सल असो वा सुख ,
तो मनात तेवत ठेवायचा असतो
त्याचीच उर्जा बनवून ,
पुढचा रस्ता उत्साहाने चालायचा असतो
धडा किंवा आठवण ,
सगळ्यांनाच सोबत घेऊन माणूस परिपक्व होत असतो-
गरज छोटी आणि स्वप्न मोठी असली
की वाटेतले गतिरोधक आपोआप कमी होतात
आणि प्रयत्नांच्या वेगाने स्वप्न लवकर गाठता येतात-
कापड कीतीही मोठं असू दे
एकदा का दोन्ही टोकं एकत्र आली
की घडी आपोआपच बसते
"संसारातही हेच सूत्र वापरावं "-
जर सुख आणि दुःखाची
बिनचूक आकडेवारी होतच नाही
मग उगाच त्यांचा हिशेब मांडण्यात
का बरं आपले दिवसरात्र जाई ?-
आनंद शोधायचा नसतो
तो तर मानायचा असतो
हर छोटा क्षण टिपायचा असतो
आणि आनंदाने जगायचा असतो-
ऋतू येती ऋतू जाती
बदल निसर्गाची निती
परी चंद्र, सूर्य , तारे
निर्विघ्न कार्य करिती-
स्वप्न तुटत नसतात... ती तर अमर असतात
आपले प्रयत्न कमी पडले की गाढली जातात
आणि मग त्याजागी नविन जन्माला येतात
उकरून पाहिलं तर ती आपलीच वाट पाहत असतात
त्यांच पूर्णत्व आणि अपूर्णत्व दोन्ही आपल्याच हातात असतात-
आपण कारणं तर नेहमीच देत असतो
कधी वेळ देऊन बघा....त्यात किती गोडवा असतो
ज्यांच्यासाठी आजन्म राबतो
त्यांसमवेत काही क्षण म्हणजे..जगण्याचा बुस्टर असतो-
माणसाच्या मोहाला सीमाच नाही
जूनं माणूस गेलं आपलं तरी धाय मोकलून रडी
माणसाच्या अलिप्तपणाचीही सीमाच नाही
परक्याच्या तान्ह्या लेकराची त्याला तमाच नाही
आपलं कवटाळून धरण्यात
ह्याचा उभा जन्म जाई
परकेपणाच्या भावनेत
माणुसकीला तिलांजली लावी
-
काही विशेष नसेल तर सारं काही नामशेष होत जाते
मरणोत्तर उरायचं असेल तर उत्तरोत्तर कार्यरत रहावे लागते-