वाहे शांत निर्मळ निखळ झरा,
नयनी न्याहाळी निसर्ग सौंदर्य,
पायांनी करी आवाज खळखळ,
वदनी झळके निरागस हास्य चातुर्य.-
सोनेरी किरणांची उधळण,
पाखरांचा किलबिलाट,
हंबरती गाई वासरे,
नवचैतन्याची नवी पहाट.-
तुझ्या चेहऱ्यावरचे भाव,
अलगद मी टिपले,
जेव्हा तुझे काळेभोर चक्षू,
माझ्या नजरेला भिडले...-
म:- मनसोक्त आनंद घ्या जीवनाचा
क:- कर्तव्यनिष्ठ रहा जाणीवांशी
र:- रंग चढू दे नव नात्यांना
सं:- संगत धरा सज्जनांची,
क्रां:- क्रांती घडवू नव पर्वाची,
ती:- तीच साजरी "मकर संक्रांती."-
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा
सुंदर ते रूप तुझं
कटेवरी हात ठेवूनी
विठेवरी उभा..
कानी कुंडल मकराकार
गळ्यात शोभे तुला तुळसीहार,
भक्तासाठी धावूनी येशी
असा तू पंंढरीराया...
सावळं हे रूप तुझं पहायला
भक्तांची ही गर्दी होई,
आषाढी कार्तिकीला
सारी पंंढरी ही दुमदुमून जाई...-
जिंदगी यूँ ही निकल जाएगी,
याद याद करते करते...
पाना किसी के हाथ में है,
ना खोना किसी के हाथ में...
हम तो ऐसे अजनबी है,
जिसके दिल में बसे हैं,
ओ तो हमें भूल भी नहीं सकते...-
भेटीचा सहवास तुझा,
भावूक होतो तुझा चेहरा,
शब्दांच्या त्या कोड्यातून,
जाणवतो नवीन गारवा.-
सोबत तू ही असावी,
असा एखादा क्षण यावा,
मी तुझ्यात रमून जावे,
अन् तू माझ्यात गुंग व्हावे.-