QUOTES ON #POEMWITHSHIVAM

#poemwithshivam quotes

Trending | Latest
23 JUN 2020 AT 10:51

इवलेशे कोवळे तण वाट पाहतो,
वाळलेले झाड आवकाशात बघतो,
तेव्हा नभ आकाशात दाटूनी येतो,
अन् चिंब चिंब भिजवून जातो..!

चंद्राच्या प्रकाशाने आभाळ चमकतो,
विजेचा कडकडात सगळीकडे होतो,
काळोख आभाळ हजेरी लावतो,
अन् चिंब चिंब भिजवून जातो..!

शेतकरी आतुरतेने वाट पाहतो,
बैल खांद्यावर नांगर घेतो,
मेघराजा त्यावर प्रसन्न हातो,
अन् चिंब चिंब भिजवून जातो..!

मोर जंगलात पंख पसरवतो,
कवी लेखणी कागदावर ठेवतो,
गगनात तेव्हा संतोष पसरतो,
अन् चिंब चिंब भिजवून चातो..!

धरतीमधुन मातीचा सुगंध सुटतो,
इंद्रधनु सप्तरंगाने अचंबित करतो,
तेव्हा अंबर सर्वांना प्रणाम म्हणतो,
अन् चिंब चिंब भिजवून जातोा..!

-


21 JUN 2020 AT 9:49

एकेकाळी साबण लावून दाढी तो करतो,
निकाललागल्यावर गुपचुप पेढे तो आणतो,
मुलाच्या आनंदात स्वतःचा आनंद तो पाहतो,
कारण , बाप हा बापच असतो.

मुलाच्या सर्व चुका पोटात तो घालतो,
मुलासाठी पूर्ण जागाच त्याग तो करतो,
वेळ आली तर स्वतः उपाशी राहतो,
कारण , बाप हा बापच असतो.

जगासमोर तो नेहमी आनंदात राहतो,
परिवारासोबत तो सदैव हसतो,
पण एकाटा असताना मात्र खूप रडतो,
कारण , बाप हा बापच असतो.

सर्व सोडून तो आहे त्या कपड्यावर येतो,
शून्यातून संपूर्ण जग निर्माण करतो,
आपल्या लहानश्या परिवाराची काळजी तो घेतो,
कारण , बाप हा बापच असतो.

बाप तर बापच असतो,
हा कवी बापासाठीच लिहतो,
बापासाठी कवी जग जिंकतो,
बाप हा बापच असतो.

-


24 JUN 2020 AT 11:58

ढगफुटीने अंबर जमीनीवर कोसळते,
वनव्याने कानन संपुर्ण राख होते,
वसुंधरा आपत्ती धारण करते,
अन् कवितेच्या एका कडव्यात
संपुर्ण दुःख समावते.

पंकज चिकलामध्ये खिलते,
शेतातील विहिरीवर रऱ्हाट फिरते,
सरीता डोंगरातून शांतपणे वाहते,
अन् कवितेच्या एका कडव्यात
संपुर्ण निर्सग वास करते.

ग्रंथामधुन जीवन गौरव होते,
ज्ञानाचा गंध त्यातुंन पसरते,
शब्दांमध्याच शब्द हरवते,
अन् कवितेच्या एका कडव्यात
संपुर्ण साहित्य समावते.

सायंकाळी सुर्य विश्राम करते,
त्याचवेळी रजनीनाख चमकते,
पृख्वीवरती स्वःताच छाप छापते,
अन् कवितेच्या एका कडव्यात
संपुर्ण विश्व वास करते.

कवितेमध्ये भावना लपते,
त्यातुनी ते प्रेम दर्शवते,
क्रोधाचा तिथेच अंत करते,
अन् कवितेच्या एका कडव्यात
एका कविते दर्शण घडते..!

-


15 JUN 2020 AT 22:46

एखादा गुन्हेगार त्याचा रस्ता विसरतो,
हिंसाच्या दिशेने वाटचाल तो करतो,
अनेक नियम व कायदे तो मोडतो,
तेव्हा , वर्दीतला देव रस्त्यावरती उतरतो.

अख्खा महाराष्ट्र गणेशोत्सव साजरा करतो,
नवरात्रीत नऊ दिवस तो उपवास धरतो,
रक्षाबंधनाला बहीणींकडे तो जातो,
तेव्हादेखील वर्दीतला देव रस्त्यावर उतरतो.

निर्सगामध्ये वादळाचा प्रकोप वाढतो,
हिवाळयात पाण्याचा बर्फदेखील होतो,
उन्हाळयात सुर्याचा पारा उच्चांक गाठतो,
तेव्हादेखील वर्दीतला देव रस्त्यावर उतरतो.

प्रत्येक गावाच्या चौकात उभा तो राहतो,
काठीवर हात ठेऊन विठ्ठल तो दिसतो,
दिवस ना रात्र सगळीकडे पहारा देतो,
तेव्हा वर्दीतला देव रस्त्यावर उतरतो.

स्वर्गातील देव जमीनीवर प्रस्थान करतो,
मानुसकीचे बीज तो शेतात पेरतो,
जमीनीवर येऊन प्रत्येकाचे रक्षण करतो,
तेव्हा खरा देव खकी वर्दीत उतरतो.

-


17 JUN 2020 AT 10:57

सीमेवरती शांततेचा सुर्य उगवणार,
पाकिस्तानी आतंकवादी रडणार,
चीनमधून रक्ताच्या नद्या वाहणार,
जेव्हा सह्याद्री हिमालयास धावून जाणार ॥

-


17 JUN 2020 AT 23:37

पाऊस पडत आहे मुसळधार,
झाला निर्सग हिरवागार,
घ्या तुम्ही आता थोडासा चहा,
आणि तुम्ही बाहेर जाऊन निर्सग पहा ॥

-


29 MAY 2020 AT 13:01

EVERY FORMULA HAS DIMENSION,
JUST DO SOME CALCULATION,
WORK WITH FULL DEVOTION,
YOU WILL GET THE SOLUTION.

EACH LIQUID HAS THE SURFACE TENSION,
EVERY THING HAS A MOTION,
NEWTON SAID, "IT HAS DURATION",
SO, FORCE EQUALS TO MASS• ACCELERATION.

FRICTIONAL FORCE IS BETWEEN ROAD & TYRE,
GENERATOR CONTAINS COPPER WIRE,
LIGHT CONSISTS OF DUAL PAIR,
SO, E EQUALS TO M•C SQUARE.

EVERY ONE IS DOING ACTIVITY ,
WITH A CERTAIN VELOCITY ,
FORCE ACTING ON IT IS GRAVITY,
DUE TO WHICH WE ARE PRODUCING ELECTRICITY.

PHYSICS IS VERY EASY,
STUDY IT JUST LIKE A CRAZY

-


24 JUN 2020 AT 11:54

ढगफुटीने अंबर जमीनीवर कोसळते,
वनव्याने कानन संपुर्ण राख होते,
वसुंधरा आपत्ती धारण करते,
अन् कवितेच्या एका कडव्यात
संपुर्ण दुःख समावते.

पंकज चिकलामध्ये खिलते,
शेतातील विहिरीवर रऱ्हाट फिरते,
सरीता डोंगरातून शांतपणे वाहते,
अन् कवितेच्या एका कडव्यात
संपुर्ण निर्सग वास करते.

ग्रंथामधुन जीवन गौरव होते,
ज्ञानाचा गंध त्यातुंन पसरते,
शब्दांमध्याच शब्द हरवते,
अन् कवितेच्या एका कडव्यात
संपुर्ण साहित्य समावते.

सायंकाळी सुर्य विश्राम करते,
त्याचवेळी रजनीनाख चमकते,
पृख्वीवरती स्वःताच छाप छापते,
अन् कवितेच्या एका कडव्यात
संपुर्ण विश्व वास करते.

कवितेमध्ये भावना लपते,
त्यातुनी ते प्रेम दर्शवते,
क्रोधाचा तिथेच अंत करते,
अन् कवितेच्या एका कडव्यात
एका कविते दर्शण घडते..!

-


22 JUN 2020 AT 23:25

लेखणी अण् शाईची महती,
ते सर्व कागदावर उमटती,
त्यामध्ये भावना हरवती,
अरे प्रेमा तुझी नावे किती..?

वाक्यांचे मिळुनी पुस्तके बनती,
पुस्तकातुन ज्ञान सापडती,
त्यामधून ते जीवन शिकवती,
अरे प्रेमा तुझी नावे किती..?

आकाशातून वात वाहती,
त्यातुन पावसाचे खेंब बरसती,
मातीतून नवीन कोंब उगवती,
अरे प्रेमा तुझी नावे किती..?

सुर्याचे किरण पृथ्वीकडे धावती,
कोकीळा मधुर गीत गाती,
संपुर्ण पहाट शोभिवंत दिसती,
अरे प्रेमा तुझी नावे किती..?

ह्रदयातुन रक्त वाहती,
त्यामध्ये भावना तयार होती,
भावनेतून काळजी जन्म घेती,
अरे प्रेमा तुझे नावे किती..?

-


23 JUN 2020 AT 10:45

इवलेशे कोवळे तण वाट पाहतो,
वाळलेले झाड आवकाशात बघतो,
तेव्हा नभ आकाशात दाटूनी येतो,
अन् चिंब चिंब भिजवून जातो..!

चंद्राच्या प्रकाशाने आभाळ चमकतो,
विजेचा कडकडात सगळीकडे होतो,
काळोख आभाळ हजेरी लावतो,
अन् चिंब चिंब भिजवून जातो..!

शेतकरी आतुरतेने वाट पाहतो,
बैल खांद्यावर नांगर घेतो,
मेघराजा त्यावर प्रसन्न हातो,
अन् चिंब चिंब भिजवून जातो..!

मोर जंगलात पंख पसरवतो,
कवी लेखणी कागदावर ठेवतो,
गगनात तेव्हा संतोष पसरतो,
अन् चिंब चिंब भिजवून चातो..!

धरतीमधुन मातीचा सुगंध सुटतो,
इंद्रधनु सप्तरंगाने अचंबित करतो,
तेव्हा अंबर सर्वांना प्रणाम म्हणतो,
अन् चिंब चिंब भिजवून जातोा..!

-