Happy Birthday!All your dreams should come true, Today's birthday for you
It's a precious reminder... And those memories Your life Get more beautiful ...Good luck!
HAPPY birthday Kranti di...-
उतरू दे तुझ्या भावना मनातून कागदावर
भावनाना तुझ्या काव्याच रूप येईल
नको करू तू मला विसरण्याचा प्रयत्न
तो नेहमीच असफल होईल
करशील जितका मला विसरण्याचा प्रयत्न
तितकीच तुला माझी आठवण येईल.-
घेऊन सोबती मावळे अवघे साठ
करण्या काबिज पन्हाळगड
घेऊन छत्रपतींचा आशीर्वाद
निघाला पन्हाळा वीर कोंडाजी फर्जंद
येऊन मार्गे महाड कोकणातून
ठोकला राजापूरास आपला तळ
पालटून वेष करण्या हेरगिरी
जाणून घेण्या अगम्य पन्हाळ गड
केला गड सर मराठ्यांनी जेंव्हा
होती मध्यरात्र अंधार काळोखाची
पोचताच गडावर त्यांनी केली
सुरुवात गनिमांना कापण्याची
झाली थेटभेट बाबूखान कोंडाजीची
त्या समयासी त्यांच्यात भयंकर युद्ध झाले
वार तलवारीचा कोंडाजिच्या पडताच
खानाच्या गळी प्राण त्याचे पसार झाले
पराक्रमाने वीर कोंडाजी फर्जंदच्या
अगम्य असा पन्हाळा आला हाती
केले कौतुक महाराजांनी त्याचे
घातले कडे सोन्याचे त्यांच्या हाती-
सोडून जिवाची पर्वा न करता
मागचा पुढचा विचार
वेगाने वार्याच्या दारात मृत्यूच्या
वेडात मराठे वीर दौडले सात
दुर्दम्य विश्वास पराकोटीची स्वामी निष्ठा
अन स्वराज्य प्रेमाने उफाळलेले उर
नजरेत फक्त बहलोल खान
मस्तकी विचार त्याचा करणे चकनाचूर
घेऊन संगतीला हे सात वीर विसाजी बल्लाळ, दिपोजी राउतराव विठ्ठल, पिळाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल विठोजी निघाले करण्या बहलोल खान ठार
अवघे सात जण निघाले देण्या
पंधरा हजार सैन्याशी झुंज
झाले दुखी महाराज ऐकून
त्यांच्या वीर मरणाची गुज
प्रणाम माझा चरणी त्यांच्या
अश्या या वेडात दौडलेल्या
पर्वा जिवाची न करता
स्वराज्यासाठी रक्त सांडलेल्या.-
आयुष्याच्या येणार्या प्रत्येक क्षणी
हवा फक्त मला तुझाच सहवास
इतक दृढ असाव आपल नात
रहावा दरवळत सदा त्यात सुवास
आयुष्याचा येणारा प्रत्येक क्षण
सोबतीने तुझ्या व्हावा खास
रहावे आपले नाते नेहमीच हसरे
न व्हावे कधीच ते उदास
आयुष्याचा येणारा प्रत्येक क्षण
संगतीने तुझ्या अविस्मरणीय व्हावा
असावा प्रत्येक क्षण आनंदाचा
नसावा त्यात कधी रुसवा फुगवा
आयुष्याच्या येणार्या प्रत्येक क्षणी
दोघांनाही एकमेकांची तितकीच ओढ असावी
झालो जरी कधी दूर आपण
मनात परकेपणाची भावना कधी न यावी.-
पडणार्या पावसात ती
उभी होती झाडाच्या आडोशाला
अंग भिजताना पाहून
दोष देत होती ती पावसाला
पान अळवाच घेऊन डोक्यावर
लटका बहाणा करत होती
वाचवत होती भिजण्यापासून
पण देहाने पूर्ण चिंब ती झाली होती
माहीत नव्हते तिला
चोरून मी बघत होतो
हलकेच तिच्यावर माझी नजर गेली
नजरेने मी तिलाच न्याहाळत होतो
शोधत होती ती निवारा
पावसा पासून वाचण्यासाठी
असुनही छत्री जवळ माझ्या
भिजत होतो तिला बघण्यासाठी-
किती झुरावे मी तुझ्यासाठी
किती मागे तुझ्या मी लागावे
कसे समजेना तुला मन माझे
वाटते तु ही माझ्यावर प्रेम करावे
ऐक ना सख्या
नजरेतून माझ्या ओळख मला
भावनेने प्रेमाच्या एकदा जरा
डोळ्यात माझ्या तूच दिसशील तुला
मुक्या माझ्या वेदना
दाखवू तुला कश्या मी
झाले घायाळ सख्या आज
प्रेमात तुझ्या आज पुरती बुडाले मी
मिठीत मला एकदा घेऊन बघ
धडधड माझी दुप्पट जाणवेल तुला
कारण ओढ फक्त तुझी आहे
सख्या माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला-