QUOTES ON #मराठीपैसा

#मराठीपैसा quotes

Trending | Latest

हम दो हमारा एक |
और..
होम लोन
कार लोन
पर्सनल लोन
गोल्ड लोन

-



तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तुमची जागा कोणीही घेऊ शकते, पण तुमच्या कुटुंबात तुमची जागा कोणीही घेऊ शकत नाही...तुम्ही असताना आर्थिकदृष्ट्या घराला जो भक्कम आधार देता तो देणारा कोणी आजूबाजूला दिसतो का पहा....नाही ना...मग आजच स्वतःच्या कमाईच्या २०पट रक्कमेचा टर्म इन्शुरन्स घ्या.

-



१९९४ साली इनोफिस मध्ये केलेल्या १०००० रुपये गुंतवणुकीचे आजचे मूल्य ३-४ करोड रुपये आहे....प्रत्येक गुंतवणूकदाराला वाटते माझ्याही पोर्टफोलिओ मधील एखादा शेअर्स ने मला अशी संपत्ती कमावून द्यावी पण जेव्हा पोर्टफोलिओ मधील एखाद्या शेअर्स मध्ये केलेली ५०००० गुंतवणूक १ लाख रुपये म्हणजेच दुप्पट होते तेव्हा सामान्य गुंतवणूकदार ५०००० नफा पदरात पाडून दुसऱ्या कंपनी मध्ये पैसा गुंतवतो....यात चुकीचे काही नाही पण जर भविष्यात त्या १ लाखाचे ५-१०-५० लाख होणार यावर त्याला विश्वास नसतो किंवा त्या कंपनीच्या व्यवसाय किती वाढू शकते याची कल्पना नसल्याने भविष्यात संपत्ती निर्माण करण्याची संधी त्याने गमावलेली असते.

-



घरातील शिक्षित पत्नीला डीमॅट अकाऊंट ओपन करून देऊन २५-५०००० रुपये ट्रेडिंग साठी देणे, आणि त्यातून "तू ५००-१००० रुपये दिवसाला कमावू शकते" असे कुठे तरी "सेमिनार मध्ये ऐकून किंवा माझ्या मित्राची पत्नी करते" म्हणून करायला सांगणे म्हणजे गाडी चालवायला न येता त्याचे स्टेरिंग हातात देण्यासारखे आहे.हे लक्षात घ्या....दिवसाला ५००-१००० मिळवणे इतके सोपे असते तर या जगात कोणीच नोकरी केली नसती.

-



हेल्थ किंवा टर्म इन्शुरन्स चे प्रीमियम भरायला पैसे नाहीत म्हणून खूप जण टाळाटाळ करतात पण लक्षात घ्या तुम्ही असताना प्रिमियम चे हजारो रुपये भरायची पंचायत होत असेल तर तुम्ही नसताना किंवा हॉस्पिटलमध्ये लाखोंचे बिल भरताना पैसे कुठून येतील.

हेल्थ इन्शुरन्स किंवा टर्म इन्शुरन्स चा प्रिमियम पाहू नका तर त्याच्यापासून मिळणारा लाखो रुपयांचा फायदा पहा.

-



शेअर बाजारात असलेल्या तेजी चा काही जणांच्या करियर- व्यवसायावर गंभीर परिणाम होतात...
२५-३०-३५ या वयात स्वतः निवडलेल्या करियर व्यवसायावर झोकून देण्याच्या काळात दिवसाला २०००-४००० कमवायच्या जाहिरात खुणावू लागतात...मग वेगवेगळे कोर्सेस करून स्वतःचा नोकरी व्यवसाय करत करत वेगवेगळे कमाईचे मार्ग शोधत राहतात...

याच काळात काही जण स्वतःच्या करियरशी निगडित नवनवीन कोर्सेस करतात आणि स्वतःचे ५ लाखाचे पॅकेज १० लाख कसे होईल यावर लक्ष देऊन तर काही व्यवसायिक स्वतःच्या व्यवसायचा विस्तार करतात....

स्वतःच्या करियर व्यवसायाला कमी लेखण्याने झटपट पैसे कमाईचा शेअर बाजार चा मार्ग त्यांना सोपा वाटतो पण या शोधत त्यांचा अभिमन्यू झालेला असतो...

-



Paid Content

-



कार असणे म्हणजे श्रीमंती असणे
आणि
चालणे म्हणजे गरिब असणे

या धारणा चुकीच्या आहेत
हे आपल्या मुलांना शिकवणे हा प्रत्येक
पालकांसाठी एक मोठा प्रपंच आहे.

-



सगळीकडे शेअर बाजार च्या तेजीबद्दल चर्चा सुरू आहेत. लवकरच LIC चा IPO बाजारात येईल...प्रत्येक घरात २-४ डीमॅट अकाउंट ओपन केले जातील...मराठी माणूस शेअर बाजारात पाय ठेवतोय म्हणून पाठ थोपाटली जाईल. पण हे सारे डोक्यात फक्त नी फक्त "दाम दुप्पट" करण्यासाठी केलेले कार्य असेल. तसे न झाल्यास शेअर बाजार जुगार आहे म्हणून बाहेर पडणारे असंख्य असतील जे....पुढच्या पिढीला यापासून दूर ठेवायचे काम करतील.

-



वयाच्या ६० व्या वर्षी..

अमाप पैसा हवा (आर्थिक श्रीमंती)

कि

गरजेपुरता पैसा, जबरदस्त आरोग्य,
चांगले नातेसंबंध, समाजात योगदान....(आनंदी श्रीमंती)

निर्णय तुमचाच...😊

-