Marathi Paisa मराठी पैसा   (महेश चव्हाण : मराठी पैसा)
26 Followers · 4 Following

read more
Joined 2 November 2019

read more
Joined 2 November 2019

घरातील शिक्षित पत्नीला डीमॅट अकाऊंट ओपन करून देऊन २५-५०००० रुपये ट्रेडिंग साठी देणे, आणि त्यातून "तू ५००-१००० रुपये दिवसाला कमावू शकते" असे कुठे तरी "सेमिनार मध्ये ऐकून किंवा माझ्या मित्राची पत्नी करते" म्हणून करायला सांगणे म्हणजे गाडी चालवायला न येता त्याचे स्टेरिंग हातात देण्यासारखे आहे.हे लक्षात घ्या....दिवसाला ५००-१००० मिळवणे इतके सोपे असते तर या जगात कोणीच नोकरी केली नसती.

-

मराठी माणसांनो आपल्या जमिनी कमी किंमतीत विकुन चूक केलीत आता चांगले शेअर्स पण १००-२०० रुपये नफा आला म्हणून विकू नका.

मार्केट डाऊन झाले तर शेअर्स डाऊन होतील पण त्यांचा व्यवसाय बंद होत नसतो. १०-२० वर्षे पकडून ठेवा जसे FD ला चिटकून राहता तसे....पुढच्या पिढी चे माहीत नाही पण स्वतःचे तरी कल्याण करून घ्याल.

#Britannia
#Asianpaints
#Pidilite
#Tata
#TCS
#bajajfinance
#TVSMotors

-

स्वतःचा टर्म इन्शुरन्स नसणे म्हणजे स्वतःची सर्व मालमत्ता वाऱ्यावर सोडून जाण्यासारखे आहे...समजा एखादा वर्ष्याला १० लाख रुपये कमावणारी व्यक्ती वयाच्या ३५ व्या वर्षी मृत्यू पावते ती मागे काय सोडून जाते...तर राहते घर त्यावर

२५ लाख रुपयांचे कर्जे
कार लोन ५ लाख
सर्व मिळून = ३० लाख

म्युच्युअल फंड शेअर्स १० लाख, पीपीफ ४ लाख, बँक FD ३ लाख, सोने ५ लाख, बँक २ लाख, इन्शुरन्स : ६ लाख
सर्व मिळून = ३० लाख

म्हणजेच काय सर्व लोन फेडण्यासाठी सर्व गुंतवणूक विकाव्या लागतील आणि आता त्याच्यानंतर फॅमिली कडे काय राहिले तर फक्त घर....
पण घर खर्चाचे काय ??? मुलांच्या शिक्षणाचे काय ??
यासाठीच स्वतःच्या गरजेनुसार टर्म इन्शुरन्स घ्या.....👍

१०.वरील ९ पायऱ्या चा योग्य गुंतवणूक सल्लागार च्या मदतीने वेळोवेळी आढावा घेतल्यास कुठलाही परिवार मग तो महिन्याला २५००० कमवत असेल किंवा २.५० लाख तरी आपले आर्थिक जीवन समृद्ध करू शकतो.

-

९.गुंतवणूक-इन्शुरन्स किती जरी योग्य आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये घेतले असले तरी आपल्या परिवाराला जर त्याची काहीच माहिती नसेल तर कुठे तरी याची संपूर्ण माहिती परिवाराला देणे.

-

८.म्युचुअल फंड गुंतवणूक ही चांगली परतावा देणारी तेव्हाच असते जेव्हातुम्ही अभ्यास पूर्वक गुंतवणूक करता किंवा प्रोफेशनल सल्लागाराची हेल्प घेऊन गुंतवणूक करता.

-

७.आर्थिक वर्ष्याच्या समाप्तीला
टॅक्स प्लॅनिंग न करता
एप्रिल महिन्यापासूनच
दर महिन्याला टॅक्स प्लॅनिंग साठी
ठराविक रक्कम बाजूला करणे.

-

६.फ्री मध्ये डिमॅट ओपन करून आपल्या जवळचे सर्व पैसे झटपट रिटर्न्स मिळवण्यासाठी न लावता....चांगले शेअर्स अभ्यास करून १०-२०-३० वर्षे मार्केटच्या चढ-उतारा मध्ये
आपल्या पोर्टफोलिओ ठेवणे.

-

५.कोणीतरी सांगतोय म्हणून गुंतवणूक न करता कधी तरी आपली कमाई बंद होणार आहे याची जाणीव ठेवून आपल्या कमाईतील १०% स्वतःच्या रिटायरमेंट साठी बाजूला काढून ठेवणे.

-

Fetching Marathi Paisa मराठी पैसा Quotes