नुसते वरवर हसतो कोणी
फार आत घुसमटतो कोणी
जरी वाटते जगतो आहे
क्षणाक्षणाला मरतो कोणी
कुणी आवडत नाही नंतर
का इतका आवडतो कोणी-
Read me on instagram page tujhyat_majhyat
का एवढी कुणाच्या प्रेमात गुंतले मी ?
वाटेतल्या उन्हाच्या प्रेमात गुंतले मी
थोडे अबोल डोळे, अन् रंग सावळासा
साध्यासुध्या मुलाच्या प्रेमात गुंतले मी
भीती मुळीच नाही वैशाख पोळण्याची
एका पळस फुलाच्या प्रेमात गुंतले मी-
फक्त इच्छा की कशाची आर्तता आहे
कोण जाणे कोणती माझी व्यथा आहे
एकटेपण हे कधी गर्दी किती करते
अन् कधी गर्दीत कोणी एकटा आहे
ठेवतो अस्तित्व स्वातीचे तिथे सागर
खोलवर दोघात जेथे शांतता आहे-
काही कविता माणसांसारख्या तर काही माणसं कवितेसारखी असतात आयुष्यात..❤️
-
रात्र रात्र जागतो कुणी बघून चांदणे
कोण शिंपतो नभात मंतरून चांदणे
वाटतो सखा मला अजून फार भाबडा
आणतो मुठीत काजवा म्हणून चांदणे
चांदण्यातुनी निघून फार दूर पोचलो
पण कसे निघायचे आपल्या मधून चांदणे-
अवघड वळणावळणाचा निव्वळ काट्याचा रस्ता
साद घालतो मला तरीही या गावाचा रस्ता
त्याच त्याच का वळणावरती फिरून येतो आहे
जणू विसरला गेला आहे ह्या रस्त्याचा रस्ता
पाऊस तुझ्या वाटेवरती गंध पेरतो आहे
उगाच शोधत बसते स्वाती तू मोत्याचा रस्ता-
ही कोणाच्या जखमांची क्षितिजावर गहिरी लाली
जी डोंगरमाथ्यावरुनी हलकेच निघाली खाली
जेव्हा जेव्हा सल एखादी डोळ्यांकाठी येते
लांघून तिला जाताना मन कातर कातर होते
-
झाला असा गुलाबी त्याचा असर पुढे
गेली कधीच नाही त्याच्या नजर पुढे
मी फक्त सोबतीचे वरदान मागले
ती एकमेव इच्छा झाली अमर पुढे
जेव्हा कधी उशाशी हा चंद्र राहतो
का झोप येत नाही मग रात्रभर पुढे
तो हात फक्त त्याचा हातात दे मला
मग दे मधाळ काही किंवा जहर पुढे
वाटेत ज्या, फुलांची आरास लागते
रस्त्यात त्याच त्याचे लागेल घर पुढे
प्राजक्त पाहिजे जर हातामध्ये तुला
घे तू मिटून डोळे अन् हात कर पुढे-
निरागस हसू तुझं,
घरभर पसरत गेलं..
तुझ्या प्रत्येक मिठीत,
माझं आईपण बहरत गेलं..
-