Swapnil Karale   (के स्वप्निल)
62 Followers · 25 Following

Writer,Poet, Blogger, Journalist
Joined 22 November 2017

Writer,Poet, Blogger, Journalist
Joined 22 November 2017
30 JUN 2023 AT 9:57

विठ्ठलाच्या भेटीगाठी रोजच्याच...

थोडं काही बिनसलं की, कंबरेवर हात ठेवून उभं असणारं जोडपं मला धीर धरायला शिकवतं. किती तरी युगं हे जोडपं असंच उभं आहे. कुणाच्या इच्छा, स्वप्नं पूर्ण करण्यासाठी, तर कुणाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी...!
मला रखुमाई भोळी भाबडी वाटते. विठुरायासाठी सारं आयुष्य तिनं वेचलेलं पाहून मला माझी आईच आठवते. मग मी वारीला का नाही जात, याचं उत्तर मिळतं! कधी कधी बापाचा आधार मला *विठ्ठलाचं* रूपंच वाटतं. मग पंढरी आपल्याच भोवती असते की! वारकरी विठ्ठलाच्या चरणाशी लिन होतो, ही मोठी बाब आहेच. माणूस हळवा, श्रद्धाळूसुद्धा असावाच; पण स्वतःच्या कामामध्ये विठ्ठल दिसणाऱ्या सावता माळ्याचा वारसा सांगणारा मी. पालखीचं दर्शन लांबून घेतो; पण आत खोलवर रुजलेल्या विठू-रखुमाईच्या साक्षीने! - स्वप्निल करळे

-

30 JUN 2023 AT 9:50

विठ्ठलाच्या भेटीगाठी रोजच्याच...

थोडं काही बिनसलं की, कंबरेवर हात ठेवून उभं असणारं जोडपं मला धीर धरायला शिकवतं. किती तरी युगं हे जोडपं असंच उभं आहे. कुणाच्या इच्छा, स्वप्नं पूर्ण करण्यासाठी, तर कुणाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी...!
मला रखुमाई भोळी भाबडी वाटते. विठुरायासाठी सारं आयुष्य तिनं वेचलेलं पाहून मला माझी आईच आठवते. मग मी वारीला का नाही जात, याचं उत्तर मिळतं! कधी कधी बापाचा आधार मला *विठ्ठलाचं* रूपंच वाटतं. मग पंढरी आपल्याच भोवती असते की! वारीकरी विठ्ठलाच्या चरणाशी लिन होतो, ही मोठी बाब आहेच. माणूस हळवा, श्रद्धाळूसुद्धा असावाच; पण स्वतःच्या कामामध्ये विठ्ठल दिसणाऱ्या सावता माळ्याचा वारसा सांगणारा मी. पालखीचं दर्शन लांबून घेतो; पण आत खोलवर रुजलेल्या विठू-रखुमाईच्या साक्षीने! - स्वप्निल करळे

-

30 JUN 2023 AT 9:48

12 JUN 2023 AT 20:41

नसलेलं दाखविण्यात आले की
'असण्याचं' सुख घेता येत नाही;
नंतर 'नसलेलंच' जपावं लागतं.

- स्वप्निल करळे

-

11 JUN 2023 AT 22:43

अनोळखीच आहे तरीही
गोष्ट जूनी का वाटे?

मी हरवतो इतका असा की
हा बंध निराळा भासे

मी इतके चाललो एकट्याने
इतका ओढलो गेलो नाही

रोजचेच बोलणे झाले
मी इतका गुंतलो नाही

ती ओढ अनामिक भासे
मज हवीहवीशी वाटे...

- स्वप्निल करळे

-

29 MAR 2023 AT 22:45

इतके काही लांब नाही गाव तुझे
वेड्या रस्त्याला माहीत नाही नाव तुझे

मी असाच भरकटलो असेच रस्त्याला वाटे
त्यास कोण सांगावे? वाटेमध्ये असतातही काटे

सरळ वळणाची नसतेच कविता प्रेमाची
मोकळाच राहतो कोपरा अन भलतेच रितेपण दाटे

गुंतली बोट अन गुंतला माणूस तो कोण?
भरभरून येतो ऊर अन भलतीच आठवण साचे

ही वाट निराळी नाही ना संग चांगला आहे
मी स्वतःस हसतो आता हा रंग आगळा आहे

पारखूनी घेतले जाते, प्रेमाचे काही नाही
मी आता देतो हाक अन हात सोडूनि जाते

ती वेळ भयानक आहे ही वेळ आगळीक झाली
मी हसलो आता नाही, मी रडलो केव्हा नाही?

- स्वप्निल करळे

-

3 MAR 2023 AT 20:33

नको भिडवूस डोळे कुणाशी मित्रा
सौदा कळण्याइतके तुझी वय नाही...

- स्वप्निल करळे

-

1 MAR 2023 AT 20:34

कोण कुणाच्या मध्ये तरी गुंतलेलं म्हणजे नातं भारी असं थोडीच आहे. गुंता सोडविता येतो ओ. मिसळलेलं बाजूला करता येत नाही. नातं मिसळलेलं असावं.
- स्वप्निल करळे

-

26 JAN 2023 AT 12:34

भरून आलं की
वाहायचं
असं सांगितलं मनाला
पण खाचखळगे
असलेल्या जागेतून
प्रवाह सापडत नाही,

भरून आलं की
वाहायचं,
सोप्पं असतं बोलायला
गुंतलेल्या भावनांना
ते जमत सुद्धा नाही,

अडकतो जीव
गुंततो सुद्धा जीव
असं म्हणतात,
अडकणाऱ्या बाबीसाठी
वाहायचं?
ते जमत सुद्धा नाही,

असण्याची झालेली असते
सवय,
चुकल्यासारखे होतं
तू नसताना,
तरीही वाहायचं नाही?
ते जमत सुद्धा नाही,

-

23 JAN 2023 AT 23:29

आलेला प्रत्येक 'थांबा'
काहीतरी 'घेण्यासाठी'च
थांबलाय. हे समजलं
की प्रवासाला वेळ झाला
याचं काही वाटत नाही.

- स्वप्निल करळे

-

Fetching Swapnil Karale Quotes