वर्णन न करता यावं अश्या या आपल्या मैत्रीचे
वर्णन तरी कसे करावे..
तू फुल मी सुगंध असेच नाते
आपले सदैव असावे...
मैत्री एक सूर की खट्याळ गाऱ्हाणे
सूर लागता होतील मधुर तराणे
काटेरी वनात देई मखमली वर्षाव फुलांचा
निःस्वार्थ भावना आणि मैत्रीच्या प्रेमाचा..
आव्हाने नवी पेलताना हात देई विश्वासाचा
नाही कुठला आव आपल्या मैत्रीत मी पणाचा
मैत्री एक प्रश्न तुझ्या माझ्या अस्तित्वाचा
मैत्री एक उत्तर हळवा कोपरा जीवनाचा..🫶❣️✍️
दिऊ..✍️❣️
-
Writer & Pro-Host 👈,news anchor🎤
Public... read more
वो भी क्या बचपन था,उम्र का कोई लिबास न था
जब मेरी जिद्द का पगडा सबसे भारी था...
सवालो के ढेरो से मेरी आवाज चहकती थी
उसके हर जवाब मे माँ तुम मन ही मन हसती थी..
तेरे माथे की बिंदी लगाकर मै हर घर मंढराती थी,
तेरी दाट खाकर तुझसे ही लिपटकर सोया करती थी...
हर छोटी सी बात पर मै तुझसे नाराज हुवा करती थी
गुस्ताखी कर मै तेरे आचल मे छुप जाया करती थी..
चांद को पकडने की कोशीश हुवा करती थी
रंगबिरंगी तितलीया पकड के खुश हुवा करती थी..
बाबा का थप्पड तो अब याद नही आता
पर उनके कंधो पर मै मेहफुज हुवा करती थी..❤️-
मैत्रीचा सुगंध चहूकडे दरवळणारा
निस्वार्थ भावना, असा मौत्रीरूपी झरा
निर्मळ हास्यछटा अशी नवचैतन्य बहरलेला
बहुमूल्य मोती असा मैत्री रूपात मला भेटलेला
दिलखुलास व्यक्तिमत्व मनास सुखावणारे
शब्दात कशी गुंफावी ही मैत्रीरुपी स्पंदन लहरे..
कलागुणांच्या क्षितिजावर तुमच्या प्रतिभेची पहाट सजावी
ओतप्रोत भरलेल्या आनंदाची अशी अनोखी लाट असावी..🌹🌹
-
तेरे मेरे इश्क का रंग बहोत गहरा है
कोई ऐरा गैरा इसे छुडा न पायेगा
चेहरे के रंग मे तो तु ढल जायेगा उसकी
पर मेरी रुह से जुडा रिष्ता तु कहा तोड पायेगा..
-
साथ एकमेकांची हवी स्वप्नांची चढण्या माडी
जीवनी रंगत गंमत हवी एकमेकांची गोडी
वचनबद्ध होऊनी एकमेकांसवे
सोडवावी आयुष्याची तुम्ही असंख्य कोडी..❤️
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा सुट्टू & वल्लभ जीजू💑🌹🌹 #shruvalls-
अर्धीच रात्र वेडी प्रश्न माथी मिरवणारी
जगण्याचे अर्थ हुडकत असंख्य 'कविता' सजवणारी..✍️
-
प्रिय आई,
आले किती ही संकट उराशी तरी ठाम पणे लढायचे
आयुष्यावर अपरंपार प्रेम करायचे पुढे पुढे चालत जायचे..
हे तूच आम्हाला शिकवलं आई.. आता पर्यंत तू बाबांच्या खांद्याला खांदा लावून आलेल्या संकटाशी दोन हात करून, कठीण काळात ही आमचा योग्य सांभाळ करून,शून्यातून विश्व निर्माण केलाय पण आज आपल्यावर जे संकट आलंय यात अनंत यातना होत आहे मान्य आहे तरीही आपल्याला यातून सावरावं लागेल ,तुला सगळ्यात मोठी साथ होती बाबांची ती आता उरली जरी नसली तरीही ते आपल्या कायम सोबत आहे हे लक्षात ठेव.आम्ही दोघेही तुझ्या कायम सोबत आहोत तुला आमच्या कडे बघून हा प्रवास पुढे जोमाने करायचा आहे.,आणि तो तू यशस्वी पणे करशील हा विश्वास बाबांना होता म्हणून बाबा आम्हा दोघांना ही तुझ्या कडे सोपवुन गेले पण त्यांचा आशिर्वाद आपल्या कायम पाठीशी आहे.झालं गेलं तिथेच सोडून हा खडतर प्रवास पुन्हा सुरु करण्याचं बळ तुला मिळो हीच ईश्वर चरणी तुझ्या वाढदिवशी प्रार्थना🙏🏻🥰🌹🎈-
ढाल बनूनी उभा राहणारा माझा बाप
बिछान्यावर कसा पडला होता
या घराला घरपण देणारा माझ्या बापाला
त्याचा आजार खुप छळत होता..
आमच्या आयुष्याचा सिनेमा
ज्याने होता दिग्दर्शित केला
स्वतः मात्र अहोरात्र काम करून
पडद्यामागचा हिरो राहिला
पणतीला जशी ऊर्जा मिळते
तेलाच्या मैत्रीने अगदी तसंच
या घराला ऊर्जा मिळत होती बाबा
तुमच्या प्रेमळ छत्रछायेने..
तुला कवितेत मांडताना
कधी शब्द सुचले नव्हते
कारण शब्दात बांधता येणारं
तुझं व्यक्तिमत्व इतकं छोटं नव्हते..
माझ्या वाटेला यावी
तुझी सगळी विघणं ही प्रार्थना होती मी केली
तुम्ही लवकर बरे व्हावे
फक्त हेच परमेश्वराला मागनी होती मी केली..
सारं संपलं असं आता वाटते आहे
देवावर विश्वास ठेवणारी मी
देवाला गद्दार समजते आहे
तुझ्या प्राणाची भीक मी मागितली
पण त्या देवानेच आज
तुझी जीवनज्योत घालवली..-