शब्दांच्या या जगात, नवी आपली ओळख...
बोलतो काय, भावना काय...काहीच नीट नाही कळत....
विणतील ही काही शब्द गैरसमजांचे जाळे...
दुराव्याला मैत्रीच्या तेवढेच निमित्त पुरे....
थट्टा, मस्करी, मस्ती, खोड्या, यातून वाढत असतं प्रेम....
लहानपण च्या आठवणीत रमणं, सर्वांचच असतं सेम...
थोडं तू घे, थोडं मी ही घेईन समजून....
इथे कुणाला ही करमनार नाही एकमेका वाचून....
वेळ लागेल थोडासा, ओळख आपली व्हायला,
सोप्पं होईल नातं निभावणं, जर एकदा भावना पुरत्या कळल्या....
झाल्या असतील चुका, तुला रुसण्याचा पूर्ण हक्क आहे...
तुझी ताई म्हणून मीच तुला मनवेन, माझं वचन पक्क आहे.....
आता जराशी हस तू, फुलपाखरू सम उड तू....
तुझ्या ताईच्या छान छान शब्दांना गोड गोड बोल तू....
मी ही करेन ह आता तुझ्या त स्तुतीचा स्वीकार....
नाहीच येऊ देणार आता माझी कुठलीही तक्रार.....
एवढीच माझी छोटीशी फक्त तुझ्याचसाठी लिहिलेली कविता कशी वाटली ते सांग,
सोडून रुसवा अग माझी रूसुबाई, तुझे मत तू मांड....- @सुविधा_
19 JUN 2019 AT 20:49