एक हाक....
एक पत्र....
सुविधा उंदिरवाडे-
आपल्या बघण्याचा कार्यक्रम आठवतोय तुला ?
आपली पहिली भेट
मी नटून थटून कांदे पोह्यांची प्लेट घेऊन आले
मी न बनवलेले कांदे पोहे
त्यानंतर आपल्याला आपल्या घरच्यांनी दिलेला एकांत
आणि त्या एकांतात,
मी हाक मारली तुला..." अहो....."
अरे केवढा शहारला होतास तू !
अजूनही आठवतंय मला
तुझं शहारणं
आणि माझं....तुझ्या प्रेमात पडणं
अजूनही आठवतंय मला
सुविधा उंदिरवाडे-
तुझ्याविना सख्या मला उदास रोज वाटते
तुलाच आठवून नभ उरात रोज दाटते-
तुझ्याविना सखे, सांगू ?
घर अगदी निष्पर्ण झाड गं...
तू असलीस की कसं,
बार - मासी बहरलेली बाग गं...-
घन गाभुळे दाटून येता
गहिवरते बघ माझी कविता
आसवांचा ओघळ म्हणजे
खळखळणारी शब्द सरिता-
तळहातावर विसावलेले
मोरपिसाचे सुंदर देह
भुरळ घालतो मनास माझ्या
हा रंगांचा सखोल डोह-
मनाला मनाचा सुगंधी शहारा
सखीच्या बटांचा अनावर पसारा
मला रोज छळतो, उशाशी पहुडतो
जसा भासतो मज, सुखाचा किनारा.-
मिठी ही सख्याची सुगंधी सुगंधी
जणू भासते मज कुपी अत्तराची
जरा श्वास श्वासात गुंफून जाता
चढाओढ चाले जशी स्पंदनांची-
थेंब थोडे आसवांचे कागदावर सांडलेले
दुःख झाले चिंब ओले अंतरीचे मांडलेले
अक्षरे झाली पुसटशी, नेमके संकेत कुठले ?
वाटते जागी सुखाच्या दुःख थोडे नांदलेले.-