तुमच्या बुद्धिमतेची आकलन शक्ती तुमच्या विचारसरणी आणि वाणी या दोन्ही गोष्टीतून दिसून येते...
© सुविधा-
Content writer
डोक्यात जेव्हा असंख्य विचार आणि मनात प्रश्नाची चलबिचल यांची अस्थिरता निर्माण असते तेव्हा एकांत हि नकोसा वाटतो.
© सुविधा-
जेव्हा आमच्या मध्ये फक्त मैत्रीचं नातं होतं तेव्हा तो वेळात वेळ काढून बोलायचा.. पण मैत्रीच्या नात्याचं रूपांतर जसं प्रेमात झालं आणि आता तो वेळेचं गणित माझ्यासमोर मांडतोय.
© सुविधा-
बहुधा असं ऐकलंय की जेवढे आपण खरे आणि पारदर्शक वागतो तेवढे आपण एकटेच पडतो, पण मला असं वाटतं की उगाच खोटेपणाचा आव आणून माणसांची गर्दी जमवण्यापेक्षा, आयुष्यात अशी २-४ माणसे कमवावी जी चांगल्या वाईट प्रसंगी कायम आपल्यासोबत खंबीरपणे उभे असतील.
वेळ आली की आपले आणि परके याची प्रत्येकाला कधी न कधी जाणीव होतेच, त्या वेळी फक्त शांत आणि संयमी राहावे.
© सुविधा-
आपसे तो बहुत बातें करने का मन होता है, पर पता नहीं आप जब भी सामने आते हो
बातें तो क्या हम खुद को भी भूल जाते हैं....
© सुविधा-
रचनात्मक आखणी उत्तम असेल तर कार्य हि सर्वोत्तम होईल...
© सुविधा-
खुप जवळून पाहिलंय
आपल्या माणसांना बदलताना
गरजेनुसार जवळ येताना आणि वेळेनुसार दूर जाताना
गोष्ट छोटीशीच असते
पण त्या गोष्टींना रंगवून सांगताना
मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात
पण चतुर व्हावं उत्तरांची सांगड घालताना
कधी कधी परिस्थिती पाहून
घ्यावे लागतात मनाविरुद्ध निर्णय
पण जाणीव असावी
सुख-दुखा:ची बेरीज वजाबाकी करताना
जगात येताना एकटे आलोय, जाताना हि एकटेच जाणार
मग का हा अट्टाहास कायम सोबत राहण्याचा
जाता जाता एकचं सांगणं
एकचं आहे स्वप्न
गेल्यावर हि तुझ्या मनात अजरामर राहणं....
© सुविधा
-
समोरच्या व्यक्ती ने जेवढे नियम आणि अटी पाळाव्यात अश्या माफक अपेक्षा ज्यांच्या असतात ना त्यांनी सुद्धा नियम आणि अटी यांना बांधील राहावे....
#आपल्याच पोळीवर तूप ओढणे.
© सुविधा-
जेव्हा जबाबदारीची जाणीव होते ना तेव्हा इच्छा आणि स्वप्नांना मनात बंदिस्त करावं लागतं..
© सुविधा-
आज कल बहुत बदले बदले से लगते हो आप,
हमसे नाराज हो या फिर कोई और मिल गए है...
© सुविधा-