...........या दुनियेत,
आपलं असणं म्हणजे
फक्त उधार किंवा उसनं आहे...
हजार कॉन्टॅक्ट असूनही
व्यक्त, मोकळं व्हावं कुठे?
तेवढा हाच एक प्रश्न आहे.....-
वो लिखते हैं,
कहर ढाने के लिए..
हम तो लिखते हैं,
गाँव से शहर जाने के लिए.!
- - Psycho शायर-
Dear Youngsters,
व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम
अन् बाकीका सोशल मीडिया...
इ सब "काम चलाऊ अन् दिखाऊ" छे...
घर गृहस्थी चलाबा करता मेहनत करणोही पडसी...
So Work hard and focus on your career!
--Unknown-
पनवेलचा वडापाव,
कर्जतची भेळ,
लोणावळ्याची चिक्की,
खंडाळ्याचा गारवा,
अन् वळणावळणाचा तो घाट...
असाच आहे..
तुझा तो नखरा अन् तो थाट...!-
ढगाळलेली मखमली सोनेरी
जशी ही पहाट आहे,
तुझ्या प्रेमात पडण्याची बहुधा
शक्यता ही दाट आहे..!-
खूब समेट्या था मेने तारा सितारा...
आजाळी रात में कोजाण्ळे बी कहा खो गया...
कभी खूब केबे था बी,
के करमत नहीं थारा बगैर एक पळ...
आज कोजाण्ळे बी सब कहा खो गया...-
❝ जामीन....❞
हसण्याने तुझ्या येते बहर
तुझे ते रुसणे अवघड आहे
पहाट होते तुझ्या आठवणीत
राती नित्य जागणे अवघड आहे
किती करावी मी गोळाबेरीज
तुझे गणित सुटणे अवघड आहे
अथांग सागर तुझ्या त्या डोळ्यात
मी तुला समजणे अवघड आहे
मी तुलाच शोधत असतो माझ्यात
बहुधा तुझे सापडणे अवघड आहे
काय सांगू दैना या काळजाची
तुला ते कळणे अवघड आहे
व्हावी वाटते कधी भेट एकदाची
तुला सवड असणे अवघड आहे
मी आहे जरा व्यस्त बंदोबस्तमध्ये
आता रजा मिळणे अवघड आहे
व्हायचं आहे मला आजन्म बंदी तुझा
कबुली जबाब तुला कळणे अवघड आहे
असेल दखलपात्र जर गुन्हा प्रेमाचा
आता जामीन मिळणे अवघड आहे
©सुरेश रामसिंग घोती,
(जरंडी, ता. सोयगाव, जि.छ.संभाजीनगर)
दि.२४ फेब्रुवारी २०२५-
❝ युगंधर...❞
हजार झाले कॉन्टॅक्ट आता, अजून नंबर नको आहे
असावा हक्काचा कुणी, नुसती गर्दी शंभर नको आहे
सदैव असावी साथ, सोबत अन् एक संगत
नुसता दुरावा अन्, आता ते अंतर नको आहे
असावा प्रेम जिव्हाळा हृदयात निरंतर
नुसती विचारपूस, तीही वरवर नको आहे
प्रेमाच्या जुगारात हरलो मी ही तुमच्यासारखाच
परत कुणी दुसरा तिसरा, दिलबर नको आहे
युद्धाने कुणास लाभले सौख्य नी शांतता?
इथे शांतीदूत पाहिजे, कुणी धुरंधर नको आहे
आधार विश्वासाची एक सावली असावी माथी
उघडे सताड मोकळे ते निळे अंबर नको आहे
कर्णासम सखा असावा सोबत, ते कौरव शंभर नको आहे
धनुर्धर अर्जुन तर सर्वांनाच पाहिजे असतो
सांगा,विजयाचा शिल्पकार असा, कुणास तो 'युगंधर' नको आहे?
©सुरेश रामसिंग घोती,
(जरंडी, ता. सोयगाव, जि.छ.संभाजीनगर)
दि.३० डिसेंबर २०२१-
"राख माती"
खूप सारं ऐकून होतो, समोर तुला भेटण्याआधी...
किती रंगवल्या मी छटा तुझ्या, प्रत्यक्ष तुला बघण्याआधी...
बहरत गेली मैत्री नकळत, शब्दात काही सांगण्याआधी,
मनातलं सारं सहज कळायचं, मुद्दा एखादा मांडण्याआधी
कुणास ठाऊक स्वप्न भंगले कसे, क्षणात काही कळण्याआधी,
गैरसमज मग वाढतच गेला, पूर्ण मला समजून घेण्याआधी...
जपायची असते मैत्री आयुष्यभर..तू डाव मोडला, तो मांडण्याआधी
उगाच झाली म्हणावी भेट आपुली, अनोळखीच होतो बरे भेटण्याआधी,
घ्यायचा होता सोबत एक कटींग चहा, तू दूर कुठे निघून जाण्याआधी,
वाट वेगळी तू आधीच निवडली होती, खरंच काही कळण्याआधी
नंबर माझा कायम असेल तुझ्याकडे
एक कॉल करशील, मला पूर्ण विसरण्याआधी
मित्रा, सख्या विनंती आहे तुला..
जमलं तर भेटून जा एकदा कधी..या देहाची राख-माती होण्याआधी.!
©सुरेश रामसिंग घोती, जरंडी (ता. सोयगाव, जि.छ.संभाजीनगर),
दि.२६ डिसेंबर २०२४-
उगाच अशी विनाकारण
जेव्हा जेव्हा तू रुसते,
तुलाच बघून मग सखे
ही कविता-चारोळी सुचते.!-