देवळातल्या भिकारी ला समजून घेऊ शकतो,
पेशा आहे त्याचा त्याच्या वेदना समजू शकतो..
पण इथ राजकारणात दरोडे जास्त झालेत,
देशाला भिकेला लाऊन मस्त पस्त झालेत...
-
पहिल्या पावसात मनसोक्त भिजावे,
ओलेचिंब व्हावे हृदयाने हृदयाशी स्पर्श करावे...
अन्नदात्या ने पेरणी च्या तयारीला लागावे,
जगाचा पोशिंदा होण्याचे कर्तव्य निभवावे..
निसर्गाला आपण साद घालावी,
झाडे लावा झाडे जगवा मोहीम राबवावी...
भटक्या जनावरांना आसरा द्यावा,
माणुसकी दाखवून त्यांचा आशिर्वाद घ्यावा...
झुळझुळणार्या हवेत रमावे,
शब्दांना धार लावून सुरात गोडवे गावे...
- सुरज आप्पा जावळे
-
वचन साहित्य
देवा भक्तीचे स्थळ झाले 36 वर्षे ,
अनुभव मंडपाचे कल्याण सदन झाले 27 वर्षे,
तेथूनच कल्याण क्रांती घडली या विश्वाची,
जे लोकतंत्र दिले या संपूर्ण जगाशी.
-
बहिणी साठी
लढ तू तुला हरवू देणार नाही मी
तुझ्या पाठीशी आहे तुझा पाठीराखा
तुला संपवू देणार नाही मी.....
.
.-
परिस्थितीचे चटके खूप खाल्लेत आम्ही
म्हणून कोणाच्या तरी वास्तवाचे चटके कमी करण्याच्या प्रयत्न करत असतो आम्ही
आमचा स्वार्थ कसा पाहणार आम्ही
कारण परिस्थितीचे व वास्तव्याची चटके खात कोणाचे तरी दुःख सावरण्याची ध्येय ठेवून वर्तमानाशी सामना करत आहोत आम्ही-
श्रीमंतीचे बाजारीकरण करू नका
श्रद्धेच्या गोष्टीला काळीमा फासू नका
गरिबाला उपवास पाळायला वार नसतो
हा त्याच्या परिस्थितीशी संघर्षाचा काळ असतो-
मित्र म्हणत होता....
तुझे माझ्या कडे लक्ष नाही,
का आता आपल्यात मैत्री राहिली नाही?
माझे उत्तर....
असे म्हणू नको वेदना होतात मला,
वैचारिक मित्र आहोत विसरणार कसे तुला..!
सुखाच्या वेळात तरी तुझ्यासोबत नाही असणार
पण दुःखात असताना बोलण्याची वेळ नाही पडू देणार.
-
मिळेल त्या परिस्तिथी चा
आनंद घेता आला की,
सुखं सुध्दा वाट्याला येतं..!!
#अनोखा_प्रवास
#माझी_लेखनी.... आदी गिरी-
कोरोना
सुरक्षित रहा घरात
कोरोना आहे दारात
धूर निघतोय शहरात
अडकू नका त्या जाळ्यात
-
🎙️योगीराज तत्व 🎙️
आप्पा आप्पा म्हणून आपुलकी वाढवतो,
आपुलकीच्या दुनियेतून सगळ्यांना आपलंसं करतोय,
या छोट्याशा हृदयात सगळ्यांना सामावून घेण्याचे काम करतोय
टप्प्याटप्प्याने आता माणसे ऋणानुबंध नात जोडतोय.
-