supriya pawar   (सुप❣️)
6 Followers · 2 Following

Joined 21 March 2020


Joined 21 March 2020
4 JUN 2023 AT 20:41

मी कुठे म्हटलं तू सात जन्म सोबतीला असावा,
एकाच जन्मी मात्र फक्त माझा असावा,
माझ्या अडखळलेल्या पावलांना सावरायला असावा,
भरून आलेलं मन खांद्यावर मोकळं करायला असावा,
माझ्या आनंदात खळाळून हसायला असावा,
चुकलेच कधी तर हक्काने रागे भरायला असावा,
फार काही नाही रे फक्त तू सोबती असावा.......

-


24 MAR 2023 AT 23:29

असेलच काही बंध
उगाच का जीव अडकावा
बदलेल्या calender मध्ये
ठरावीक तारखाच का अधोरेखीत व्हाव्यात
नाही वळालो मागे तरी
फुटलेल्या मनाचे बांध का अडवावे
धूसर होत चाललेल्या आठवणी
का डोळ्यात दाटाव्या

-


21 MAR 2023 AT 9:40

तुला लिहिताना शब्द आठवावे लागत नाही
यमक जुळवावं लागत नाही
वेळेचं भान राहत नाही
मी माझी राहत नाही

मनातलं सारं तुला सांगता येत
तू judge करणार नाही हे माहीत असतं
काही गुपीत फक्त तुझ्या माझ्या मध्ये ठेवता येतात
मी कितीही बोलले तरी तू फक्त ऐकून घेते

वाटेल तेव्हा भेटता येत तुला
Appointment ची गरज भासत नाही
मी कितीही दुर्लक्षित केलं तुला
तरी तुझा ego आड येत नाही

माझ्यातली मी तुझ्यात शोधते
तू माझ्यात की मी तुझ्यात राहते माहीत नाही
पणं तू मला नेहमीच सांभाळते......
......सुप❣️




-


8 OCT 2022 AT 0:10

तुझ्या माझ्या बहुतांश भेटीचा साक्षीदार होता तो,
ऋतू नसताना वेळी अवेळी बरसायचा तो,
मिठीचा मोह आपल्या आवरला नसेल त्यालाही,
हजेरी लावलीच होती त्याने अगदी शेवटच्या भेटीलाही,
कालपासून बेभान बरसतोय

तुझी खुशाली पोहोचवायला आला असेल बहुदा,
सांग थांबायला त्याला आता.....
भिजलेली मागची पान सावरली नाहीत अजून,
किती ते त्याचं बरसणं तुला-मला आठवून......

सुप ❣️

-


22 SEP 2022 AT 21:01

तक्रार नाही रे पण.....
तुझ्या मिठीवर अन् तुझ्यावर फक्तं माझचं अधिराज्य असावं,
ऊन-पावसाचा खेळ असावा पणं सोबतीला तू असावं,
थोड लहान असेल घरटं पणं त्यावर तुझं-माझं नाव असावं,
खूप नसेल आयुष्य पणं माझ्या नावात तू असावं,
ओंजळ रिकामी असेल पणं त्याला तुझा हात असावा,
खिडकीतून समुद्र नसेल दिसत पणं तुझ्या डोळ्यांत तो असावा.........
सुप ❣️

-


11 SEP 2022 AT 19:50

आपल्या आवडत्या व्यक्तीला दूर जावू देता यायला हवं,
पणं त्या व्यक्तीनेही सांगावं की जायचयं म्हणून......
आपण आपलं आपलं म्हणून जपायचं न समोरच्याने आधीच मैल भर अंतर कापायचं....
त्याने कापलेल अंतर आपल्याला पार करता येत नाही,
अन् त्याने मागे फिरून बघायचं नाही......

मग मात्र हिशोब चुकतात भावनांचे......

सुप ❣️

-


1 SEP 2022 AT 0:08

तुझं माझ्यासोबत असणं किती खास आहे बघ ना
ना कसली भीती ना कसली चिंता,
तुझं माझ्यासाठी नकळत उभ रहाणं,
पावलापावलांवर तू आहेस याची जाणीव करून देणं,
चुकल्या आयुष्याला योग्य दिशा देणं,
सदैव लढण्याचं बळ देणं,
प्रत्येक धडपडीत सावरणं,
न मागता देतच आहेस तू सार...
तुझ्या सोबतीच मागणं आहे तुझ्याचजवळ,
ते मात्र हिरावून घेऊ नकोसं.........

सुप❣️

-


19 AUG 2022 AT 21:22

तू ना कृष्ण
मी ना राधा
ना मीरा
ना रुक्मिणी
तू प्रवाही
मी स्थिर
राधाकृष्णा सारखं नसेल ही
अन् तुझ्यासारखं ही नसेल
पण तू नसतानाही तुझ्यावरचं प्रेम करणं जमतं बघं आजही मला...

-सुप❣️

-


31 JUL 2022 AT 20:18

अजूनही तशाच आहेत आठवणी तुझ्या लख्ख,
अगदीच जणू कालपरवाच्या भेटीसारख्या

नुकत्याच पडलेल्या पावसासारख्या,
पहाटेच उमललेल्या फुलासारख्या

निरागस हसऱ्या बाळासारख्या,
धुंद मोगऱ्याच्या सुगंधासारख्या

देवघरातल्या नंदादीपासारख्या,
वाऱ्याच्या झुळकेसारख्या

अजूनही तशाच आहेत आठवणी तुझ्या लख्ख....



-


16 JUL 2022 AT 21:28

चिक्कार मोहाचे क्षण सावरलेत तू जवळ असताना,
तू दूर असताना भेटीचा मोह मात्र आवरता येत नाही.

भीती नसायची तुझ्या मिठीत असताना,
तुझ्या मिठीशिवाय शांत झोप मात्र येत नाही.



-


Fetching supriya pawar Quotes