Sunita P. Anabhule   (Sun)
40 Followers · 5 Following

Joined 21 June 2018


Joined 21 June 2018
27 APR AT 1:04


नवी पालवी फुटते,
स्पर्शून मनाला जाते,
जुन्याशी नाते जुडते,
हळवे बंध उलगडते!!१

माती गंधित होते,
सुगंधा परी दरवळते,
जाऊनी आभाळा भिडते,
प्रभा आसमंती फुलते!!२

धरणी न्हातीधुती होते,
नवतीचा साज लेते,
हिरव्या श्रृंगारी सजते,
उरी कारुण्य दाटते !!३

ASunita

-


26 APR AT 14:05



रंगीबिरंगी फुलांच्या दुनियेत रमते मी,
आशेच्या सप्तरंगी स्वप्नात विहरते मी,
आकाक्षांच्या हिंदोळ्यावर झुलते मी,
सख्याच्या कोमल आठवणीत झुरते मी!!!!
ASunita

-


22 APR AT 20:50



स्वच्छ,सुंदर आणि निर्मळ आहे आपुली धरा,
तिच्या रक्षणा कटिबद्ध राहू वचन देऊ सागरा,
राखून मान,करु सन्मान उत्तुंग गाठू शिखरा,
पर्यावरण संरक्षण मानू कर्तव्याच्या अधिकारा!!!


ASunita

-


21 APR AT 11:38


1) Respect to each and every one.
2) learnt from each and every one.

-


16 APR AT 9:52


Help everyone and respect everyone.

-


11 APR AT 12:09


झरा
स्वप्नील आकाशीचा,
मनी झरतो झरा,
मनामनात बरसल्या,
सुखाच्या जल धारा !!

कल्लोळ भावनांचा,
उरी भेगाळलेला,
शापित गंधर्वांपरी,
सुटकेत दाटलेला !!

आतुर सुप्त तृष्णा,
बरसेल मेघ जेव्हा,
माझ्या मनाचा झरा,
फोडेल वाट तेव्हा !!
ASunita

-


11 APR AT 12:02


झरा
स्वप्नील आकाशीचा,
मनी झरतो झरा,
मनामनात बरसल्या,
सुखाच्या जल धारा !!

कल्लोळ भावनांचा,
उरी भेगाळलेला,
शापित गंधर्वांपरी,
सुटकेत दाटलेला !!

आतुर सुप्त तृष्णा,
बरसेल मेघ जेव्हा,
माझ्या मनाचा झरा,
फोडेल वाट तेव्हा !!
ASunita

-


7 APR AT 23:56


उशाखाली तुझा फोटो चांदरातीला,
प्रेमाच्या आठवांचा डोह मनी दाटला,
तुझ्या अलवार दिठीत देह माझा गोठला,
भान काळाचे नुरले ना तुला, ना मला,
माझ्या कोवळ्या गालावरी चंद्र हासला,
स्वप्निल राजकुमार स्वप्नी आला भेटीला,
ऐश्वर्य पाहुनी माझे चंद्रही भुलला!!

सुनिता अनभुले.

-


6 APR AT 9:04

||जय श्रीराम ||

राम बोला राम, मुखाने राम बोला राम ..
चला चला हो अयोध्येला,
राम लल्ला पाहण्याला,
असत्यावर घालून घाला,
विजयी होऊन पुढे चला,
राम बोला राम, मुखाने राम बोला राम ..१
संस्कृती अपुली जपण्याला,
हिंदू पताका घेऊ चला,
रघुवंशी सूर्या पुजण्याला,
नेत्री दीपक उजळू चला,
राम बोला राम, मुखाने राम बोला राम...२
आनंदाच्या परमक्षणाला,
दारी तोरणे सजवू चला,
लक्ष दिव्यांनी लखलखला,
विजयी पताका मिरवू चला,
राम बोला राम, मुखाने राम बोला राम.....३

सौ सुनिता पांडुरंग अनभुले.मुंबई

-


30 MAR AT 19:38



वर्ष सरले, दुःख हरले,
नववर्ष हासत अवतरले,
नवं हर्षाचे नवं उन्मेषाचे
दारी तोरण नटले सजले!!

आले आले वर्ष नवे,
भविष्याचे वेध नवे,
स्वप्न सारे पूर्ण व्हावे,
पूर्ती साठी हात हवे !!
Asunita

-


Fetching Sunita P. Anabhule Quotes