माझा मी...
मी बदलू कुणासाठी, जगलो मी मनासाठी
का मी बदलायचे,स्व साठी जगायचे
हा स्वार्थ अजिबात नाही,
का म्हणून मी उगा, मन मारायचे
विचार केलाच होता, मी साऱ्या जगाचा
नसताना काही, सार काही देण्याचा
भरभरून दिले तरी, का कमीच पडले ?
हिशेब शेवटी रिते होण्याचा, म्हणून या वळणावर
काय बिघडले जर मी, विचार केला माझ्या मी चा
असाही वाईट ठरलो, तसाही बदनाम तरी
सारे बाजूला ठेवून, आता स्वतःसाठी जगायचे
हवे तसे रहायचे, हवे तसे वागायचे
स्वच्छंदी होऊन मस्त, मजेत बागडायचे,
स्वतःहून स्वतःच्या समाधानाचे, दरवाजे उघडायचे
पाठी फिरून आता, नाही पहायचे, ना जायचे
दुरून डोंगर आता साजरे करायचे
तिथून या जगाला हात जोडायचे
स्वतःच्या जगात आनंदात राहायचे
मी...अविराज !!!
-
पोरका झाला तो प्रत्येकजण
ज्याला मायेची सावली दिली
स्तब्ध झाले आज प्रत्येक क्षण
भयाण शांतता सर्वत्र पसरली
नतमस्तक सारे गहिवरले मन
निराधारांची आज आई हरपली
तुमची येईल हो सदैव आठवण
एक ज्योत धगधगती शांत झाली
माई पुन्हा होणे नाही काही करून
पोरक्या ईश्वराला आज माय भेटली-
संकल्प तर दर वर्षी करतो,
अमलात आणला जातो का ?
निश्चय तर नेहमी करतो,
निर्णय पण तशे घेतो का ?
स्वतः साठी सगळेच जगतो,
दुसऱ्यासाठी कधी जगतो का ?
सल्ला तर सगळेच देत असतो,
आपण ही तशे वागतो का ?
-
श्वासातला श्वास दिला, घासातला घास...
आपल्यांच्या नजरेत तरी, मी झालो नापास !!!
झेलला मी अलगद जरी त्रासातला त्रास...
माझ्या असण्याचाच झाला प्रत्येकाला त्रास !!!
नाही केला मी कधी कोणाचाच दुस्वास...
टाळू लागले प्रत्येकजण तरी माझा सहवास !!!
राहून राहून वाटते पुरे झाले आता बास...
माझ्या स्वभावानेच केला माझाच ह्रास !!!
मी कधी मीपणाचा लावला नाही फास...
नेहमीच बाळगला मी चांगुलपणाचा ध्यास !!!
-
एक ऐसा भी हात चाहिए, जो दे दे हमे सहारा, एक ऐसी भी बात चाहिए,जो बदल दे जीवन सारा...
आया एक फरीश्ता, ना था उससे कोई खून का रीश्ता, बस हौसले बुलंद थे उसके, एक जिद थी, एक जूनून था...
ना जाने वोह कहा से आया, खुशी की लहर साथ लाया, इस अंधेरी उलझी हुई जिंदगी में रोशनी की सौगात लाया...
इस मतलबी दुनिया में आज कल कौन किस के लिये क्या करता है, पर वोह है की हर पल हमारी तंदुरुस्ती के लिये जा निछावर करता है...
कूछ पल में ही वोह जिंदगी का एक हिस्सा बन गया, वर्तमान तथा भविष्य का महत्वपूर्ण किस्सा बन गया...
जजबा कुछ कर दिखाने का, अहसास हासील करने का, माईंड और बॉडी की इस गेम मे हार कर जीत जाने का...
हम यूही सदा आपके साथ रहेंगे बनकर आपकी परछाई, आज के इस अवसर पर हेमंत सर आपको जन्म दीन की बहोत बहोत बधाई...
-
सगळ्यांना चांगलं दिसायचं असतं चार चौघात पण... ,
कोणालाच चांगलं वागायचं नसतं चार चौघांसाठी... !!!-
पाप पुण्य चा तराजू जोखणारे आपण कोण ?
एकमेकांची लख्तरे काढणारे
आपण कोण ?
हिशेब ज्याचा त्याचा मांडणारे
आपण कोण ?
अंतिम निर्णय एकतर्फी देणारे आपण कोण ?
आपण कोणी संत नाही, आपण कोणी पुण्यवान नाही, आपण न्यायाधीश नाही, मग दुसऱ्याला आपल्याच जागी राहून उपदेश देणारे आपण कोण... ....???-
माणसाने कस पुस्तक असावं,
कधी खुल तर कधी बंद...
त्यालाच ते वाचता येत,
ज्याला वाचण्याचा असतो छंद !!!-
दशहारा हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ तुमच्यातील
दहा वाईट गुण काढून टाकणे आहे
काम, क्रोध,
मोह, लोभ,
गर्व, मत्सर,
स्वार्थ, अन्याय,
क्रूरता व अहंकार...
याला 'विजयदशमी' असेही म्हणतात, ज्याचा अर्थ या दहा वाईट गुणांवर विजय आहे. माझ्या सर्व आप्त,स्वकिय, हितचिंतक
यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏-