Sunil Gondhali   (Sunil Gondhali..)
567 Followers · 47 Following

Joined 22 June 2018


Joined 22 June 2018
Sunil Gondhali AN HOUR AGO

आठवणींचं गाठोडं अगदी
चारचौघात सुटलं
अन शाळेतलं प्रेम
मनातल्या मनात हसलं...

-


Show more
7 likes
Sunil Gondhali 11 HOURS AGO

कोसळणाऱ्या पावसात
वाहून जावा संसर्ग
पुन्हा हसावं जग अन
व्हावा दुःखाचा विसर्ग..!

-


Show more
10 likes
Sunil Gondhali 31 MAY AT 10:41

कुठे असतो का स्वाभिमान..?
पोटातल्या भुकेच्या आगीसमोर
तहानलेल्या जिव्हेच्या आशेसमोर
एखादी चतकोर पडते ना...तेव्हा
स्वाभिमान गुंडाळून ठेवावा लागतो
आग विझवण्यासाठी..तृषा शमविण्यासाठी...

कुठे असतो का स्वाभिमान..?
जगण्याचा संघर्ष सुरू झाल्यावर
अखेरच्या घटका मोजू लागल्यावर
एखादा देवदूत भेटतो ना...तेव्हा
स्वाभिमान गुंडाळून ठेवावा लागतो
संघर्ष थोपवण्यासाठी..कालचक्र रोखण्यासाठी...

कुठे असतो का स्वाभिमान..?
सुख उंबरठ्यावर आले असताना
दुःख परतून जातो म्हणताना
एखादा दैवी क्षण ओंजळीत पडतो ना..तेव्हा
स्वाभिमान गुंडाळून ठेवावा लागतो
सुखाला उंबरठा ओलांडण्यासाठी अन...
दुःखाला निरोप देण्यासाठी..!

-


Show more
9 likes · 4 comments
Sunil Gondhali 31 MAY AT 10:31

स्वाभिमान फक्त
पुस्तकातल्या कथा
वास्तवाच्या जगात मात्र
लांगुलचालनाच्या विस्कटलेल्या बाता..
वेळेनुसार वागावं लागतं
सोयीस्कर जगावं लागतं
स्वाभिमानाच्या आडोशाला
स्थिरावतात सुखाच्या भाकडकथा..!

-


Show more
12 likes · 5 comments
Sunil Gondhali 30 MAY AT 23:42

वेध पावसाचे लागले की
मला ते हळवे क्षण आठवतात
तुझ्या माझ्या प्रीतसोहळ्यात
भिजलेले शब्द पाझरतात...

-


Show more
7 likes
Sunil Gondhali 30 MAY AT 15:21

पुसण्यासाठी हात नाही कुणाचा
आसवांना बेवारस का करावे
जगणे अमूल्य आहे माणसा
उगाच का रडत बसावे...!

-


Show more
13 likes · 2 comments
Sunil Gondhali 30 MAY AT 15:16

उगाच का रडत बसावे
जखमांना कुरवाळत राहावे
जगावे असे कोड्यापरी
मरणास ही कोडे पडावे...

उगाच का रडत बसावे
आसवांना व्यर्थ वाहवावे
जगावे असे फुलांपरी
मरणास ही कौतुक वाटावे...

उगाच रडणे इथे
गुन्हा अनाकलनीय आहे
कशास करावी फिर्याद वृथा
कशास सजेला बळी पडावे...

-


Show more
11 likes · 2 comments · 1 share
Sunil Gondhali 29 MAY AT 15:29

मुकयोध्ये आम्ही गुरुजन
संसर्गाशी लढतो आहे
पाटी पुस्तक सोबत घेऊन
रणशिंग जोमाने फुंकतो आहे...

जमाव इथला संसर्गाचा
सभोवताली घेरतो आहे
किती आवरू अन कसा वाचवू
विचार मनी घोळतो आहे...

माणुसकीचा धर्म म्हणुनी
शाळा घरकुल केली अवघी
व्यवस्थेचा पाया होऊन
इमला निरामय जपतो आहे...

सुधारक हा समाजमनाचा
संसर्ग रोखण्या समजावत आहे
विसरून घरातील चिमणपाखरे
कुटुंब जगाचे सांभाळत आहे...

नामोल्लेख जरी नसे कुठेही
मुकयोध्या खंत न कसली
चिवचिवाट शाळेचा ऐकण्या
तनमन त्याचे व्यस्त आहे...!

-


9 likes · 1 comments · 1 share
Sunil Gondhali 29 MAY AT 11:31

आठवणींचा पसारा
मी चार ओळीत मांडतो
तू आवरायला येशील म्हणून
रोज थोडं थोडं लिहितो...

आठवणींचा पसारा
मी अचूक वेळी शोधतो
तू सावरायला येशील म्हणून
रोज थोडं थोडं जगतो...

आठवणींचा पसारा
हल्ली नेमका तुझ्यासारखा वागतो
मी आवरायचं म्हणतो अन
नेमकं नव्यानं भूतकाळ उलगडतो...

-


Show more
9 likes · 2 comments
Sunil Gondhali 28 MAY AT 18:17

आठवते ना तुला
आपली पहिली भेट
नजरेला नजर भिडलेली
हवाही गुलाबी झालेली
थोडी तुझ्या थोडी माझ्या
काळजात हुरहुर सुद्धा वाढलेली..

तुझा तो गोरामोरा चेहरा
अन गालांवरची लाली
ओठांना झालेला भार गालांचा
कविता ओठांआड लपलेली...

आठवतंय ना तुला
आपण अगदीच स्मितहास्य केलेलं
अन कित्येक जन्माचं गाऱ्हाणं
एका क्षणात मान्य झालेलं...

आठवतंय अगदी सगळंच
अन मी आजही जपून ठेवलं आहे
तुलाही आठवतंय का ग सगळं
प्रेम नजरेतून पाझरलेलं..!

-


Show more
9 likes · 3 comments

Fetching Sunil Gondhali Quotes

YQ_Launcher Write your own quotes on YourQuote app
Open App