Sunil Gaikwad   (सुगाज्)
103 Followers · 84 Following

Joined 7 September 2018


Joined 7 September 2018
20 AUG 2021 AT 23:16

आधीचा पाऊस आवडायचा नाही
आता राहवत नाही त्याच्या शिवाय,

आधीचा पाऊस तीच्या
अंगणात पडायचा,

आता माझ्या वावरात
पडतोय...

सुगाज...

-


24 JUL 2020 AT 15:33

तुझ्या असण्यान
किंवा नसण्यान
त्याला काहीच फरक
पडत नाही.....
तो बरसत असतो
त्याच्या भावविश्वात
अन् निनादतो
त्याच्या ढंगात....

-


19 JUL 2020 AT 22:04

चक्रव्यूह....

आयुष्याच्या वाटेवर असणार्या
प्रत्येक अभिमन्युने
येणार्या प्रत्येक चक्रव्युहात
अडकावच अस नाही ना...

...काही सोडवतात अलगदपणे
चक्रव्यूह....

-


10 MAR 2020 AT 17:42

त्याच वाटा
त्याच लाटा
तु पालवी हो
वारा होऊन
नव्याने ये....

-


10 JAN 2020 AT 14:51

कल के ही आयने मै
तुम मुझे तराशने लगीं हो ।
आयना बदल कर तो देख
जानेमन।
आज मै रूख बदल के
आया हूं
चंद्रमा का साथी जो हूं ।

-


30 DEC 2019 AT 15:25

फसत काहीच नसत
फक्त....
रुजाव लागत जाणीवांच्या
एका एका
शब्दां शब्दां बरोबर..

-


14 DEC 2019 AT 22:19

मी पाऊस होऊन
कोसळायचो
तुझ्या अंगणात

तु मात्र स्तब्ध बसुन
असायची
बंद घरात

-


30 NOV 2019 AT 17:51

टाकत जा पावलं
जनावर जागी होतात
माणसाच्या मनातील
तुझ्यातील निरागसता पाहुन

ज्यातुन जन्म आपुला झाला
त्याचसाठी हिंस्र पशु सारखी
वागु लागतात माणसं...

टाकत जा तु
आता धैर्यानंपावल
त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी

-


18 NOV 2019 AT 22:47


गावच्या मातीत अजूनही
टिकून आहेत,
जाणवून देत असतात
अस्तित्व गावाच ,
अन् अधोरेखीत होत जाते
ओढ गावमातीची ठशांबरोबर....

-


5 NOV 2019 AT 23:33

ती..
जागतिकीकरण
महिला सबलीकरण च्या
विषयांवर बोलुन झाल्यावर
ती थेट असते स्वयंपाकघरात

अन् मळायला घेते
जुन्या रूढी,
पंरपरेच पीठ

पण ती अजूनही थकली नाही
उभारी घेत असते
तव्याच्या प्रत्येक चटक्यानीशी
गात असते नव्याच गोडव

खरं तर तीला
प्रत्येकातुन मध्य साधायचाय
अन् स्वतः ला सावरू पहायचय.....

-


Fetching Sunil Gaikwad Quotes