डोळ्यातल्या आश्रु ला तू हसण्यात कसं दाखवतेस
मन घट्ट करून सगळं कसं सोसतेस
दुःख, वेदना सगळ्या ठीक आहे म्हणतेस
आणि आस नसतानाही कुठली, हसत कशी राहतेस
तुझं ते मन मोकळं हसणं
तुझं ते साधेपणानं वावरताना लाजणं
ह्याच त्या सगळ्या गोष्टी आहेत
ज्याच्यामुळे मला तू आवडतेस.-
आयुष्य माझं नाटक
नाटकातलं तू मुख्य पात्र
अस्थिर असे भरलेले प्रसंग सारे
प्रत्येक चिंतेचे समाधानी उत्तर तू
प्रश्न तू , उत्तर तू, सगळ्या गोष्टीतील
सोबत राहणारे सूत्र तू-
एक सांगायचं होतं खरं खरं
तुला ते तेव्हा खोटं वाटल असतं
भावनेपेक्षा तू शब्दालाच पकडलं असतस
-
पाहिलं परत एकदा आज
आणि धडधड ती पून्हा सुरू झाली
बघत बसावं वाटत होतं तुला
तितक्यात तुझी बस आली-
माहीत नाही हे काय आहे
जे तू प्रेम समजतोस
कधी हसून मनात रडतो
कधी रडून मनात जमवतो
वर वर प्रयत्न चांगलें नक्की करतो
विचार करून मनात प्रेम आणखी भरतो
एके वेळी भावना शून्य नक्की होता तू
पण आज काल भावनेच्याभरात चीड चीड पण करतो तू
तू प्रयत्न नक्की करतो दूर होण्याचा
जाता येत नाही दूर तर प्रश्नात पडतो तू
जवळ गेलास की आणखी प्रेमात पडतो तू
आणखी प्रेमात पडतो तू
वेळात वेळ काढून विचार नक्की करशील जास्तीचा
जर प्रेम असेल हे तर
ह्या क्षणाला लिहून देतो तुला त्रास होईल प्रेमाचा-
नकारात्मक विचाराला खत पाण्याची गरज नसते
ते वाढत जातात शेतातल्या तनासारखे
किती जरी संपवायचा काढायचा प्रयत्न केला तरी ते वाढत जातात
डोक्यात घर करत जातात
सकारात्मक विचाराला संपवत जातात-
नकारात्मक विचाराला खत पाण्याची गरज नसते
ते वाढत जातात शेतातल्या तनासारखे
किती जरी संपवायचा काढायचा प्रयत्न केला तरी ते वाढत जातात
डोक्यात घर करत जातात
सकारात्मक विचाराला संपवत जातात-
हो पाहिलंय सगळं काही
सगळं काही पाहिलंय मी
पाहिलंय मी स्वतःला हसताना
पाहिलंय मी स्वतःला मन रमावताना
पाहिलंय मी स्वतःला हारवताना
पाहिलंय मी स्वतःला बदलताना
पाहिलंय मी स्वतःला रडताना
पाहिलंय मी स्वतःला दुसऱ्यंपासून तुटताना
पाहिलंय मी स्वतःला दुसऱ्यंपासून तोडताना
पाहिलंय मी स्वतः ला संपवताना
पाहिलंय मी आपले लोक गमावताना
हो पाहिलंय सगळं काही
सगळं काही पाहिलंय मी-
नाही राग कुणाचा
ना कुठलाही द्वेष
जरी मनात विचार हजार
दिसतो मी फक्त एक
पाहतो मी स्वप्न एक
तयार होतात दृष्य अनेक
विरोधी समोर दिसतात हजार
हाजारोमध्ये माझेच विचार
विचारांमध्ये चेहरा माझाच एक
दिसलं माझं रूप जरी एक
रूपामध्ये रंग अनेक
द्वेष मनात स्वतःचा
राग मनात स्वतःचा
विचार हजार मात्र मी कायम एक-