Soul Writer   (मेघेश सावंत)
98 Followers · 71 Following

A whole hearted mechanical engineer who likes to play with words..
Like to spread smiles
Joined 12 September 2017


A whole hearted mechanical engineer who likes to play with words..
Like to spread smiles
Joined 12 September 2017
13 JAN AT 23:44

नभीच्या चंद्राला ढगांनी विळखा घातला,
ही गोष्ट नाही चंद्राची हा तर काहूर मनातला..
प्रश्न अनेक मनाला या ढगांसारखेच छळतात,
मग तुटत्या ताऱ्यासारखे अश्रू हळूच ओघळतात..
त्या तुटत्या ताऱ्याला नभाची ही साथ नसते,
गुरफटलेल्या मनाला मोकळं व्हायला अशीच एखादी रात असते..

-


10 DEC 2023 AT 0:26

हल्ली हसातोच तसा मी,
पण हसण्यात नसते ती मजा..
कामावरून घरी जातो आता,
तेव्हा आई नाही तर बंद घरचा दरवाजा..

हल्ली बोलतोच तसा मी,
बोलणं कसलं बडबड नुसती...
मालवणी शिव्या खाऊन मम्मीच्या,
आता तिच्याशी नाही करू शकत मस्ती..

हल्ली जगतोच तसा मी,
दिवसा मागून दिवस जातात..
आईच्या फोटोवरचा तो हार पाहून,
काळजात तडा आरपार जातात..

-


12 NOV 2023 AT 0:23

दारात कंदील आणि रोषणाई,
फराळात चकली,करंजी, शंकरपाळी होती..
आई घरात असतानाच,
मी पाहिली ती खरी दिवाळी होती..

-


19 OCT 2023 AT 23:10

निपचित पडली होती लेखणी,
दिसत नव्हती इतकी देखणी..
हिरमुसलेला तो कागद कोरा,
आता कमी झालेला त्याचा तोरा..

शब्द कुठेतरी हरवलेले,
यमके झालेली अस्थाव्यस्थ..
रोजच्या धावपळीत माझ्या,
कवितेला मिळाली शिकस्त..

थांबलो क्षणभर मी,
जुन्या कविता पहिल्या चाळून..
कधी डोळ्यात पाणी आले,
कधी हसलो खळखळून..

आता पुन्हा लिहायला घेतो,
सुरुवात थोडी अवघड असेल..
चुकतील शब्द, खाडाखोड होईल,
पण रचलेली कविता तितकीच सुंदर असेल..

-


16 NOV 2022 AT 22:23

दिवसभराची सर्व जबादारी संपवून संध्याकाळी निवांत बसताना अचानक "मम्मी" म्हणून हाक येते.
पण समोरून उत्तर येत नाही तेव्हा जाणीव होते की हाकेच्या आधी समोर उभी असणारी आई आता कितीही हाक मारली तरी येणार नाही.
हे सत्य पुन्हा एकदा डोळ्यांत पाणी आणत आणि
मी तिन्ही जगाचा स्वामी नसलो तरी आईविना भिकारी आहे याची स्पष्ट जाणीव होते.

-


19 AUG 2022 AT 0:38

चार भिंती एक छप्पर,
अस घर फक्त उरलं।
आई जाताच माझं असं,
नशीब अचानक फिरलं।

ना बडबड आता तिची,
ना तिचा आवाज असणार।
कामावरच्या डब्यात पुन्हा,
तिने दिलेला घास नसणार।

जपायला हवं माणसांना,
आयुष्य म्हणजे अळवावरचं पाणी,
निघून जाते आई जेव्हा,
तेव्हा बदलते आयुष्याची कहाणी।

-


17 AUG 2022 AT 23:34

तिच्या असण्याने होते घराला घरपण,
माझ्याचसाठी असायची तिची वणवण।
असायला हवी होती ती अजून थोडे दिवस,
हेच वाटत राहते मला प्रत्येक क्षण।

तिच्याविना आता घर आमचे सुने,
ती नाही तर आयुष्यात सर्वच उणे।
गेली ती पाखरासारखी उडून,
ठेवून माझ्या ओंजळीत ते सारे क्षण जुने।

चुकीचं केलंस देवा तिला अस घेऊन गेलास,
काही तासांतच माझं आयुष्य उध्वस्त करून गेलास।
आता कधीच नसेल मला माझ्या घरी जायची घाई,
कारण माझी वाट बघणारी तिकडे नसेलच ना आई।

-


10 JUL 2022 AT 0:14

झाली पूर्ण वारी,
भेटली ती विठुमाई।
सूख दुःख सारे,
ठेवली त्याच्या ठाई।।

ओसंडून वाहिली पंढरी
नाद घुमला पांडुरंग,
विठ्ठल नामा संगे,
दंगले टाळ मृदुंग।।

-


5 MAY 2022 AT 23:30

होत्या कित्येक तक्रारी तूझ्याबद्दल,
तू मिठीत येता त्या साऱ्या दूर झाल्या।
तक्रारी होत्या रांगेत उभ्या जाब विचारण्या,
स्पर्श तूझा होताच त्याही फितूर झाल्या।

-


7 JAN 2022 AT 14:06

Masoom sa chehra ye,
Uski adi tedhi likhawat...
Masoomiyat puri hai isme,
Na hai koi milawat..

Umar choti jarur hai,
Par hosale bilkul nahi kacche..
Masoomiyat se bhare ye,
Ye hai nayi sadi ke bacche...♥️

-


Fetching Soul Writer Quotes