उषःकाल होता होता
विझला ताम्हण दिवा
मात्र आशेच्या उजेडाचा
दीप तेवायला हवा
नकारात्मक ऊर्जेला
दाखवून बाहेरची वाट
सकारात्मक विचार
मनात आपल्या साठवा
वाईट चालीरितींना तुम्ही
थारा न द्यावा कधी
मोह माया मद मत्सराला
डोक्यातून दूर पाठवा
चांगल्याला चांगले मिळते
वाईटाला संगत वाईट
निर्मळ ठेवून मन आपले
अंगी चांगुलपणा ठेवा-
इंद्रायणी काठी// देवाची आळंदी
प्रेमामध्ये बंदी// पांडुरंग
येतो दर्शनासी// दुरून चालून
भक्तीत तल्लीन// वारकरी
देगा आता बापा// मज तू दर्शन
डोळे झाले क्षीण//बघण्यासी
संतांचीच कृपा// संतांचाच मेळा
आला गोतावळा//आवडीचा
सावळीच मूर्ती//तुळस सावळी
सावळ्याच्या भाळी// सजलीया
एकरूप होई//देव आणि भक्ती
येईल विरक्ती//जन्माठाई-
यादों की डायरी हो गई है
लम्हों लम्हों में है शेर लिखा
लगता है थोड़ी बांवरी हो गई है-
हमें संभालना आया नहीं
आसमां छूने की चाहत में
रास्तों पर चलना आया नहीं-
आला आला वारा
बरसल्या मेघ:धारा
चिंब झाली धरणी
रोमारोमात शहारा
सुगंधित रानोमाळ
हिरवाईचा रंग न्यारा
प्रफुल्लित झाले जग
त्यात मन हे आवारा
आला तरुणाईचा मोहर
सृष्टी करते पुकारा
डोळ्यांमध्ये साठवावा
निसर्गाचा हा नजारा-
सरली कालची रात आता कशाला उद्याची बात?
काल उद्याला सोडून दे अन् आज ठेव तू मनात
पहिल्या प्रहरी कर जोडूनी आभार देवाचे मान
त्याच्यामुळेच उघडून डोळे दिवस पाहिला छान
कालच्या घटना उद्याची चिंता सोडून दे तु क्षणात
आता कशाला उद्याची बात.....
क्षमा मागुनी क्षमा करुनी ठेव मनात दयामाया
नश्वर आहे जग सारे नश्वर आहे आपली काया
नव्या उमेदीने नवा जन्म घे टाकून जुनी ती कात
आता कशाला उद्याची बात.....
आजचा दिवस अनमोल गड्या आज पुन्हा येणे नाही
जग असे मनभरून की जगाचे काही देणे घेणे नाही
आपले कर तू साऱ्यांना अरे काय ठेवले मी पणात
आता कशाला उद्याची बात.....-
आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे
मिटतील काय डोळे जे स्वप्न उद्याचे पाहे
निजले दिसे जग हे वरवर शांत भासे
अपूर्ण जीवनाचे काहूर माजले असे
मिटवून पापण्यांना मन शांत करू पाहे
आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे
जीवनाच्या वाटेवरती सुटले सुसाट वारे
शांत भासऱ्या रातीला तुटले अमोघ तारे
नभामध्ये तरीही बघ चंद्र चमकतो आहे
आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे-
गालांमध्ये हळूच हसल्या
निष्पाप कळ्या वेलींवरच्या
असा कसा तो निरोप गेला
उनाड भवऱ्यास दुरवरच्या...
सुगंधित झाले आसमंत
कळ्या उमलून फूल झाल्या
कुणी ओढल्या कुणी खुडल्या
कुणी उचलल्या कुणी पाडल्या...
काही सजल्या सेजेवरती
काही मात्र चितेवर निजल्या
काही देवाच्या चरणी वाहिल्या
काही वेलींवरी राहिल्या...
नशिबाचे होते खेळ सारे
काही वेलीच्या चरणी पडल्या
काही गेल्या काही जगल्या
काही मात्र मनातच रडल्या...-