SONAL SHINDE PATIL  
780 Followers 0 Following

read more
Joined 14 June 2020


read more
Joined 14 June 2020
3 AUG 2021 AT 11:08

विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही.....
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही

छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला,
अजुन अशी भिंत नाही

माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे..
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही..

रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर..
डोळ्यांत जरी गेली धूळ,
थांबण्यास उसंत नाही..

येतील वादळे, खेटेल तुफान,
तरी वाट चालतो..
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही

- सुरेश भट

-


2 AUG 2021 AT 11:55




The child who is decked...

THE CHILD WHO is decked with prince's robes and who has jewelled chains round his neck loses all pleasure in his play; his dress hampers him at every step.

In fear that it may be frayed, or stained with dust he keeps himself from the world, and is afraid even to move.

Mother, it is no gain, thy bondage of finery, if it keep one shut off from the healthful dust of the earth, if it rob one of the right of entrance to the great fair of common human life.

- Rabindranath Tagore.

-


1 AUG 2021 AT 10:05

मैत्री एक सोपी व्याख्या आहे..
'रोज आठवण यावी असं काही नाही,
रोज भेट व्हावी असं काही नाही,
एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं

असंही काहीच नाही,
पण मी तुला विसरणार नाही
ही झाली खात्री आणि
तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री.

शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी
बसणं महत्वाचं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी
माणसातलं माणूसपण जाणलं...
अशा सगळया मित्र-मैत्रिणींना मैत्री दिनाच्या शुभेच्छा.
ही नाती टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या...


कवी: पु.ल.देशपांडे

-


26 JUL 2021 AT 16:10

वेळ TIME

वेळ कशीही असो वाया जात नाही...
वेळ चांगली नसेल तर
वाईट वेळेचा अनुभव येतो आणि
चांगली वेळ असेल तर जगण्याला आनंद येतो
प्रत्येक वेळेचं महत्त्व समजून घेतलं,
की कळतं... वेळ कशीही असो...
वाया जात नाही.

-


18 JUN 2021 AT 20:44

असे जगावे दुनियामधे ,आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखूनी नजरेमध्ये ,आयुष्याला द्यावे उत्तर

नको गुलामी नक्षत्रांची ,भीती आंधळ्या तारांची
आयुष्याला भिडताना हि, चैन करावी स्वप्नांची

असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखूनी नजरेमध्ये ,आयुष्याला द्यावे उत्तर

पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती ,काळीज कडून देताना

संकाटासही ठणकावून सांगावे ,आता ये बहतर
नजर रोखूनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर

करून जावे असेही काही ,दुनियेतुनी या जाताना
गहिवर यावा जागास सारा, निरोप शेवटचा देताना

स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर
नजरेमध्ये नजर रोखूनी ,आयुष्याला द्यावे उत्तर
- वि.दा.करंदीकर

-


1 DEC 2020 AT 21:27

लोकं म्हणतात एक तरी मुलगी असावी...का आणि कशासाठी?

-


1 AUG 2020 AT 21:01

आज हा देवचं Quarantine झाला...
माणसाच्या धावत्या प्रवासाला याकाळी
लगाम लागला.
जगण्याची नवीन ओळख दाखवायला
दूरदेशातून एक पाहुणा आला.
सुरू झाले युध्द निशस्त्राचे तुमचे आमचे त्याच्याशी.
एका एका श्वासाची...
मग जाणीव होऊ लागली स्वतःशी.
मुखवट्यांची माणसे आधी परकी वाटायची...
आता त्यातच शोधावी लागताय माणसे
आपल्या नात्याची.
कधी वाटले नव्हते की चार भिंतींशी नातं जुळेल.
रात्रीची निरव शांतता दिवसालाही जवळचे करेल.
चुकल्या साऱ्यांच्या दिशा मार्ग सारे सुने झाले...
नवं काही शोधता-शोधता दिवस मात्र जुने झाले.
चांगले झाले तेवढे अंधश्रद्धेचा घात झाला.
बुरसटलेल्या विचारांचा आज कुठेतरी मात झाला.
मृत्यूचा असा तांडव पाहून आज तोही दार लावून बसला.
कुण्या काळच्या त्याच्या विश्वासावर कदाचित...
आज तोच मात्र हसला.
घंटेचा निनादही परका झाला...
अजानाचा आवाजही नाहीसा झाला.
मनात फक्त एक आणि एकचं विचार आला...
आज हा देवचं Quarantine झाला.

Title Courtesy Pranil Gilda Sir&Written by Priyanka Sarwar.

-


19 JUL 2020 AT 12:38

जिनके पास सब रहता हैं ना,
उनसे लोग नफरत नहीं करते,
उनसे लोग जला करते हैं।
When someone has everything,
People don't hate them.
They envy them.
--रात अकेली हैं(Trailer)

-


16 JUL 2020 AT 18:11

सबको अपने-अपने कर्मों का पता होता हैं,
यूही गंगा किनारे भीड़ नही होती।

-


14 JUL 2020 AT 21:50

97%लोग थक के किसी काम को छोड़ देते हैं और जिंदगी भर उन 3% लोगों के लिए काम करने लगतें हैं
जो कभी भी हार नहीं मानते।

-


Fetching SONAL SHINDE PATIL Quotes