संतोष प्र.जांभळे   (संतोष जांभळे)
257 Followers · 366 Following

Joined 13 February 2019


Joined 13 February 2019

प्रेम
प्रेम म्हणजे फुलांतला सुगंध,
शब्दांत नसलेला एक अनाम गंध।
हे नातं नसतं केवळ स्पर्शाचं,
ते असतं हृदयाच्या खोल गाभ्याचं।

कधी अबोल, कधी बोलकं,
कधी हसतं, कधी ओलावलेलं।
साथ असतं ते प्रत्येक श्वासाचं,
नसतं ते फक्त काळाच्या वाटचालीचं।

प्रेम म्हणजे समजून घेणं,
न बोलता मनाशी बोलणं।
प्रेम म्हणजे तुझं नि माझं असणं,
या जगात एकत्र चालत राहणं।

-



तेरे दिल मे रहे
इन गुलाब की पंखुडीयों की तरह
हर रोज तुम्हे मेहेकाता रहे

चाहे हम रहे ना रहे
लेकिन
हमारी खुशबू हमेशा
आप के दिल मे रहे

-



प्रेम हे आपले असेच राहो
हातामध्ये हात शेवटच्या श्वासापर्यन्त राहो

-



प्रिय मनीषा
कधी रुसतेस, कधी हसतेस,
कधी माझ्याशी भांडतेस,
कशीही असलीस तरी,
या मनाला तू खूप आवडतेस

-



आ रहा हू मै जिंदगी
जिने के लिए
दुखोनसे दूर
खुशिया सिमट ने के लिए

-



लग्नानंतर 50 वर्षे सुखात कशी
सरली आम्हाला कळलेच नाही
आज साजरा करताना हा सोहळा
डोळ्यांतून आनंदाश्रु ओघळत होती

लग्नानंतरची आयुष्यातील ती पहाट
आणि आज 50 वर्षानंतरची ही पहाट
कानामध्ये खूप काही सांगत होती

सहचरिणेनीने सुखदुःखात दिलेली ती साथ
मुलांच्या संगोपनासाठी केलेली जीवाची धडपड
मनाला आज सुखद आनंद देत होती

ईश्वरचरणी एकच प्रार्थना करतो आता
जीवन आमचे आनंदात राहो सदा 🙏

-



लग्नानंतर 50 वर्षे सुखात कशी
सरली आम्हाला कळलेच नाही
आज साजरा करताना हा सोहळा
डोळ्यांतून आनंदाश्रु ओघळत होती

लग्नानंतरची आयुष्यातील ती पहाट
आणि आज 50 वर्षानंतरची ही पहाट
कानामध्ये खूप काही सांगत होती

सहचरिणेनीने सुखदुःखात दिलेली ती साथ
मुलांच्या संगोपनासाठी केलेली जीवाची धडपड
मनाला आज सुखद आनंद देत होती

ईश्वरचरणी एकच प्रार्थना करतो आता
जीवन आमचे आनंदात राहो सदा 🙏

-



अशाच एका सायंकाळी
शांत अशा वाटेवरती
भेटली होतीस तू मजला

पाहताच क्षणी मी तुजला
देहभान हरपून गेलो
काहीच न बोलता तूला
सर्व काही सांगून गेलो

अशाच एका सायंकाळी
वारा ही मग शांत झाला
हळूच तुझा गालावरती
स्पर्श तुला तो करून गेला

-



अ आज का दीन रहे
ब बरकत से भरा
रा राह जिंदगी की
र रहे खुशियों से भरी
संतोष की है यह
दिल से दुआ
जन्मदिन आए
फिर इक बार दुबारा

-



सुरू होता उन्हाळ्याची सुट्टी
तशी होते आम्हा मुलांची गट्टी
बंधन नसते आम्हावर कसलेच आता
पुस्तकं होऊनी बंद बसतात दफ्तरामध्ये
खेळांना मग येतो उधाण सारा
कोणी खेळतो लंगडी तर कोणी कबड्डी
कोणी लपंडाव तर कोणी पकडा-पकडी
मनातला आनंद गगनात मावत नाही
मुलांना आता दिवस पुरत नाही
आईचा जसा येता आवाज कानी
मुलांची तशी धांदल उडते भारी
उन्हाळ्याची सुट्टी असते लय भारी
उन्हाळ्याची सुट्टी असते लय भारी

-


Fetching संतोष प्र.जांभळे Quotes