बेपनाह इश्क़ की एक यह भी है कहानी
झुकता है सर जहाॅं दिल मिलते रूहानी
इश्क को ऐसे जब लगे नफ़रत का रोग
बेअसर हो जाती है तब दवाईयां पुरानी
-
कामसी जरी तिचे तारूण्य आहे
दुनिया ही श्वापदांचे अरण्य आहे
नमते घेतसे तो बरेचदा तिच्यापुढे
तरीही करारी त्याचे शारण्य आहे
संयम सुटते वाणीवरचे रागात तो
प्रेमात मात्र उत्कट कारूण्य आहे
नदीहून संथ समुद्री लाटांचे तरंग
झोंबरे सभोवताली वारूण्य आहे
मोह त्यागुन वैराग्य पत्करतात ते
पुज्यनीय योग्यांचे धारीण्य आहे
संमोहनाचे कसब अवगत त्याला
अति विषारी तयाचे जारण्य आहे
गर्व दशाननाचा मुखी कैकसीच्या
मातृत्व विजयी पण दारूण्य आहे
@स्नेहल
-
पाचोळे आम्ही हो पाचोळे
देवाचे आम्ही असू लाडके
नियतीचा डाव स्विकारतो
जरी दिसतो तुम्हास रडके
सुखी फाटक्या झोपडीत
ठिगळे आकाश दाखवी
चांदण्यांशी आपुली यारी
नदी काठ तहान भागवी
रस्ता आपुला सहकारी
जिथे काम तिचं पंढरी
इथून तिथे तिथून इथे
अशी चालते रोज वारी
उराशी कवटाळून तान्हा
उन्हात खेळ दाखवितो
मिळेल थोडे काही त्यात
भुक दिवसाची भागवतो
पाचोळ्याचा काटा प्रिय
फुलांची न आम्हा हौस
बिऱ्हाड घेतो पाठीवरती
उन्हं,वारा अथवा पाऊस
@स्नेहल
-
परीकथेतील राजकुमारा
एक माझा तुला सवाल
सपनात कायले येत तू?
येऊन नको करू बवाल
आता काई फायदा नाय
सुखाचा चालला संसार
ध्यानी, मनी मुरत येक
सोडला म्या फुका ईचार
जाय रं तिकडं व्हय
लय तरास तुजा पाई
परीकथेचा तू नायक
पर नायिका मी न्हाई
😄
@स्नेहल
-
विश्वाचा हा सातबारा
जिथे श्वास तिथे वारा
देव, भावाचा भुकेला
व्यर्थची फापट पसारा
-
परी म्हणू की सुंदरा
स्वर्गातली तू अप्सरा
गंध तुझा मद-मस्त
मन द्वारी तुझी गस्त
जरी न मी गंधर्व यक्ष
कधी येशील प्रत्यक्ष
ओढ तुझी मला लागे
येतो तुझ्या मागे मागे
कौल दे जरा प्रीतीचा
गडी रांगड्या मातीचा
नाद सोडतो तुझा मी
नाही तू मोठी आसामी
@स्नेहल
-
पदरावरती जरतारीचा मोर
बघून ती झाली भाव विभोर
चेहऱ्यावर होती चिंतेची कोर
मनात अजिबात नव्हता चोर
कमावणारी मी एकटीच घरी
होते कधी जागोजागी उधारी
इच्छेला माझ्या ठेवते बाजुला
नको असते मला कर्जबाजारी
भावाला शिकवून मोठा करेन
बहिणीचे थाटात लग्न उरकेन
घेईन भाऊ साडी मला छानशी
साडितल्या मोरासह मी नाचेन
स्वप्न माझे स्वप्नच राहिले ताई
सांगे व्यथा साडी बघणारी बाई
म्हणे सगळे स्वार्थ साधुनी गेले
साडी दूर, जवळ आजारी आई
@स्नेहल
-
उद्धार करण्या भरतभुमीचे
नारायण कृष्ण रूपात आले
भरून पावली गोकुळ नगरी
नंदाघरी नंदनवन फुलले....
करी बाळकृष्ण नाना लीला
गोकुळ कृष्ण नामात रंगले
यशोदेचे लोचन कौतुकले
नंदाघरी नंदनवन फुलले....
अवतारला पालक स्वगृही
सत्य नंद यशोदेने स्विकारले
नियतीचा केला आदर अन्
नंदाघरी नंदनवन फुलले...
@स्नेहल-
प्रिय स्नेहल,
❤️
जेवढी गोड ती, तेवढीच गुणी
तिची बरोबरी करेल का कुणी?
❤️
मितभाषी तरी मार्गदर्शन छान
धडपडी करण्या मैत्रीस महान
❤️
गोबऱ्या गालावर हास्य शोभते
तुझी हसरी छबी खूपच भावते
❤️
उत्तम आई,पत्नी ,मुलगी आहे
तू, कर्तव्य पथावर खंबीर आहे
❤️
न बघवे आम्हा तुझे मन भंजन
पाहू दे तुझे ते मोहक हास्यवदन
❤️
Many Many Happy Returns Of The Day SNEHA
🌹🎂🌹🎂🌹🎂🌹🎂🌹
-